अप्पी आमची कलेक्टर मालिकेत येणार नवं ट्विस्ट, डोहाळे जेवणाची जोरदार तयारी | पुढारी

अप्पी आमची कलेक्टर मालिकेत येणार नवं ट्विस्ट, डोहाळे जेवणाची जोरदार तयारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतील कदम परिवारात भरपूर दिवसांनी आनंदाचा क्षण आला आहे. अप्पीचा सातवा महिना सुरु झाला आणि घरात अप्पीच्या डोहाळे जेवणाची तयारीनी वेग घेतला. अर्जुन आणि अप्पीचा पूर्ण परिवार आनंदानी या सोहळ्याची तयारी करत आहेत.

संबंधित बातम्या 

एकिकडे स्वप्निल ही रूपालीसोबत घरीच थांबायचे ठरवतो. दुसरीकडे सरकारला सुजय किंवा मनी त्याचे गुपित अर्जुनला सांगेल यांची भिती सतवत आहे. सरकार ठरवतो की, अप्पीला सर्व सत्य सांगायचे. मनी रूपालीला अप्पीचे डोहाळे जेवण होतंय आणि घरातली लोकं तिच्याकडे लक्ष नाही देत असं बोलून तिला भडकावते. मनीच्या बोलण्याने रुपाली घरातल्यान समोर हट्ट धरते की तिचे हे डोहाळे जेवण आजच करायचं तेही अप्पीसोबत.

काय होईल जेव्हा अर्जुनला सरकारचे सत्य अप्पी सांगेल?, अप्पी आणि अर्जुन रुपालीचा हट्ट पुरवणार का?, मनी आपला डाव खेळ्यांत सफल होणार का? या सर्व प्रश्नांचे उत्तरे ‘अप्पी आमची कलेक्टर’ च्या येणाऱ्या भागात समजणार आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 

Back to top button