Arbaaz khan Giorgia andriani : अरबाज खान-जॉर्जियाचं ब्रेकअप | पुढारी

Arbaaz khan Giorgia andriani : अरबाज खान-जॉर्जियाचं ब्रेकअप

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता अरबाज खानपेक्षा तब्बल २० वर्षांनी लहान असलेली मॉडल, डान्सर जॉर्जिया एंड्रियानीचा अरबाजसोबत ब्रेकअप झाला आहे. एका मुलाखतीत जॉर्जियाने हे देखील शेअर केलं की, ‘यावेळी आम्ही खूप चांगले मित्र आहोत. (Arbaaz khan Giorgia andriani ) आणि नेहमी खूप चांगले मित्र राहू. त्यावेळी आमची मैत्री अधिक होती. आम्ही नेहमीच एकमेकांच्या जवळ राहिलो आहोत. सोबत मज्जा-मस्ती देखील होती. मला वाटतं की, हे देखील एक कारण होतं की, मित्र होणे कठिण होतं. मला वाटतं की, सुरुवातीपासूनच आम्ही दोघे जाणत होतो की, आम्ही नेहमीएकत्र नसणार आहोत. पण आमच्या दोघांकडेही हे मान्य करायचं धाडस नव्हतं.’ (Arbaaz khan Giorgia andriani )

संबंधित बातम्या – 

अरबाज खान आणि मलायका यांच्या नत्याबद्दल बोलताना जॉर्जियाने एका वेबसाईटला सांगितले की, ‘यामुळे माझ्या बॉन्डवर कोणताच फरक पडणार नाही. अरबाजचे मलायकासोबत जे नाते होते, ते कधीच मध्ये आले नाही. त्यांच नातं आधीच संपलं होतं. तिने आणि अरबाजने एकमेकांच्या सहमतीने निर्णय घेतला होता. अरबाजसाठी तिच्या मनात नेहमीच चांगल्या भावना राहतील.

अरबाजचे लग्न मलायका अरोराशी झाले होते. आता ती अर्जुन कपूरला डेट करत आहे. अरबाज आणि मलायका २०१७ मध्ये वेगळे झाले होते. त्यानंतर अरबाज अनेक वेळा जॉर्जिया सोबत दिसला.

वयात बराच फरक 

अरबाज आणि जॉर्जिया यांच्यात २० वर्षांचे अंतर आहे. ती अरबाजपेक्षा तब्बल २० वर्षांनी लहान आहे. रिपोर्टनुसार, अरबाजने म्हटलं होतं, ‘आमच्या वयामध्ये खूप अंतर आहे. पण, आमच्यापैकी कुणीलाही ते अनुभवलं नाही. मी कधी-कधी तिला विचारतो की, काय हे खरोखर आहे?’ जेव्हा तुम्ही एखाद्या नात्यात येतो, तेव्हा तुम्ही खूप पुढचा विचार करत नाही. परंतु, दीर्घकाळ तुम्ही नात्यात राहिल्यानंतर तितकेच प्रश्न अधिक असतात. ज्याचं उत्तर देणं खूप गरजेचं असतं….मला वाटतं की आम्ही आमच्या जीवनाच्या त्या त्या टप्प्यावर आहे, जे आम्ही विचार करत आहोत की, हे कसे होणार, आणि हे नाते पुढे घेऊन जाणे किती कठीण आहे. माझ्यासाठी आता बोलणे खूप कठीण होईल.’

Back to top button