Kapil Sharma-Sunil Grover : दुरावा मिटला! कपिल शर्मा-सुनील ग्रोव्हरचं भांडण मिटलं | पुढारी

Kapil Sharma-Sunil Grover : दुरावा मिटला! कपिल शर्मा-सुनील ग्रोव्हरचं भांडण मिटलं

पुढारी ऑनलाईन डेस्क : डॉ. गुलाटी अर्थातच कॉमेडियन सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा यांच्यातील दुरावा मिटला आहे. अनेक वर्षांनंतर दोघे पुन्हा एकत्र काम करणार असल्याची माहिती समोर आलीय. जवळपास ७ वर्षे दोघे एकत्र काम करत नव्हते. (Kapil Sharma-Sunil Grover) त्यावेळी दोघांचेही फॅन्स ‘का रे दुरावा’ म्हणत दोघांनी पुन्हा एकत्र यावे, यासाठी अभिलाषा बाळगत होते. आता ७ वर्षांनंतर दोघे नेटफ्लिक्सच्या शोमध्ये दिसणार असून त्यांच्यासोबत कृष्णा अभिषेक धुमाकूळ घालायला येतोय. सोबत किकू शारदा, अर्चना पूरण सिंह, राजीव ठाकूरदेखील दिसणार आहेत. सुनील ग्रोव्हरने डॉ. गुलाटी आणि गुत्थी हे दोन्ही पात्र उत्तमरित्या साकारले होते. या पात्रांची भूरळ सर्वांना पडली होती. (Kapil Sharma-Sunil Grover)

संबंधित बातम्या – 

रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियातील शोमधून भारतात परतताना कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरमध्ये भांडण झाले. त्यानंतर दोघांमध्ये दुरावा झाला. आता शोमध्ये दोघे पुन्हा दिसणार असल्याने त्यांच्या फॅन्ससाठी ही आनंदाची बातमी आहे.

सुनील ग्रोव्हर चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये बिझी आहे. सुनील ग्रोव्हर शाहरुख खानच्या जवान या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत होता. आता तो नव्या चित्रपटात मग्न आहे.

कपिल शर्माने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर याची माहिती दिलीय. त्याने कॅप्शनमध्ये म्हटलंय- जवळपास सात वर्षांनंतर दोन कॉमेडियन नेटफ्लिक्सच्या शोमध्ये एकत्र दिसतील. या शोमध्ये त्याच्यासोबत किकू शारदा, कृष्णा अभिषेक, अर्चना पूरण सिंह, राजीव ठाकुर दिसतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

Back to top button