सुनिधि चौहानच्या आवाजातील ‘मन हे गुंतले’ गाणं ऐकलं का? | पुढारी

सुनिधि चौहानच्या आवाजातील ‘मन हे गुंतले’ गाणं ऐकलं का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : नुकताच आलेल्या “आटा पिटा” गाण्याने महाराष्ट्रात धुरळा उडवला होता. त्या गाण्याला आपले मधुर स्वर देणारी आणि आपल्या इतर अनेक गीतांमधून रसिकांचे मन नेहमी जिंकणारी गायिका ‘सुनिधि चौहान’ हिच्या आवाजतील ‘छापा काटा’ चित्रपटातील गाणे ‘मन हे गुंतले’ प्रदर्शित झाले आहे.

संबंधित बातम्या –

‘मन हे गुंतले’ गाणं ‘सुनिधि चौहान’ यांनी गायलं असून ‘गौरव चाटी’ यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे आणि ‘शिवम बरपंडे’ यांनी लिहिलं आहे. ‘छापा काटा’ चित्रपटाची निर्मिती सुशीलकुमार अग्रवाल यांनी केलीय.

मन हे गुंतले गाणे
मन हे गुंतले गाणे

संदीप मनोहर नवरे यांनी दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी प्रमुख भूमिकेत दिसणार असून मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर हे सुप्रसिद्ध अभिनेते झळकणार आहेत.

Back to top button