अपारशक्ती खुराणा
अपारशक्ती खुराणा

Trending Song Tera Naam Sunke : अपारशक्ती खुराणाचे नवीन “तेरा नाम सुनके” गाणं भेटीला

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अपारशक्ती खुराणा हा एक उत्तम अभिनेता तर आहे सोबतीने तो एक उत्तम संगीतकार गायक देखील आहे. (Trending Song Tera Naam Sunke) संगीत कौशल्य दाखवून त्याने अभिनयाच्या सोबतीने आपली ही बाजू पक्की केली आहे. नुकतेच त्याच 'तेरा नाम सुनके' हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यापूर्वी "कुडिये नी" या गाण्याने प्रेक्षकांना आपलंसं केलं आणि गाणं सुपरहिट ठरलं. (Trending Song Tera Naam Sunke)

संबंधित बातम्या –

२५ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळवून हे गाणं आजही तितकच ट्रेंड मध्ये आहे. निर्मान यांनी लिहिलेले आणि संगीतबद्ध केलेले हे गाणं अभिनेत्री निकिता दत्ता हिच्या सोबत शूट करण्यात आले आहे.

आपल्या नवीन गाण्याबद्दल बोलताना अपारशक्ती म्हणतो " मला वाटते की मी वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी करतोच आहे आणि अजून नवनवीन काम करण्याचा प्रयत्न करत राहणार आहे.

ज्युबिलीसाठी बॅक टू बॅक पुरस्कार जिंकणे बर्लिनच्या सर्व फिल्म फेस्टिव्हलमध्ये कौतुक मिळणे, होस्टिंग, गाणी या सगळ्या गोष्टी मला आनंद देऊन जाणाऱ्या आहेत. माझ्या म्युझिक प्रोजेक्ट् सिंगल "कुडिये नी" ला इन्स्टाग्राम आणि स्पॉटिफायवर खूप प्रेम मिळाल्यानंतर आता हे नवं गाणं प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहे. मी लिहिलेलं संगीतबद्ध केलेली ही गाणी प्रेक्षकांना मोहित करून जातील यात शंका नाही."

'तेरा नाम सुनके' चाहत्यांना आणि संगीत रसिकांना अपारशक्ती खुराणा यांच्या संगीत प्रवासाची अनोखी झलक दाखवणार तर आहेच आणि अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळविलेल्या 'बर्लिन' या चित्रपटाच्या यशानंतर अपारशक्ती उंच भरारी घेत राहणार आहे. बर्लिन व्यतिरिक्त अपारशक्ती पुढे बहुप्रतीक्षित "स्त्री 2" मध्ये दिसणार आहे आणि अॅप्लॉज एंटरटेनमेंट निर्मित "फाइंडिंग राम" या आकर्षक माहितीपटात तो झळकणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news