नागराज मंजुळे दिग्दर्शित “खाशाबा” चित्रपटाचे चित्रीकरण सुरु | पुढारी

नागराज मंजुळे दिग्दर्शित "खाशाबा" चित्रपटाचे चित्रीकरण सुरु

पुढारी ऑनलाईन डेस्क : जिओ स्टुडिओज आणि आटपाट निर्मित आगामी मराठी चित्रपट खाशाबाचे चित्रीकरण सुरू झाल्याची घोषणा केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे या बायोपिकचे दिग्दर्शन करत आहेत. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचे ऐतिहासिक पदक जिंकणाऱ्या आणि स्वतंत्र भारतामध्ये वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे पहिले भारतीय कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाच्या हा प्रयत्न आहे.

मराठी मातीतील विस्मृतीत गेलेल्या एका झुंजार नायकाचा असाधारण जीवनप्रवास खाशाबा चित्रपटाच्या निमित्ताने मांडला जाणार आहे.

या निमित्ताने नागराज मंजुळे म्हणाले की, ‘सैराटनंतर ही माझी तिसरी मराठी फिल्म आहे. जिओ स्टुडिओज सोबत या महत्वाकांक्षी निर्मितीसाठी आम्ही सज्ज आहोत. मागच्या तीन वर्षांपासून आम्ही ‘खाशाबा’ची तयारी करत आहोत. आज याच चित्रीकरण सुरू होत आहे याचा मला आनंद आहे.’ जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, गार्गी कुलकर्णी आणि आटपाट निर्मित, नागराज पोपटराव मंजुळेद्वारा दिग्दर्शित ‘खाशाबा’ २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

Back to top button