IFFI 2023 :’रबिन्द्र काब्य रहस्य’ चित्रपटांतून रवींद्रनाथ टागोरांच्या कवितांना मानवंदना | पुढारी

IFFI 2023 :’रबिन्द्र काब्य रहस्य’ चित्रपटांतून रवींद्रनाथ टागोरांच्या कवितांना मानवंदना

पणजी : दीपक जाधव, रबिन्द्र काब्य रहस्य या बंगाली चित्रपटातून रवींद्र टागोर यांच्या कवितांना मानवंदना देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. हा चित्रपट रहस्यमय असून एक साहसी कथा असल्याचे दिग्दर्शक सायंतन घोषाल यांनी सांगितले. 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय पॅनोरमा विभागांतर्गत रबिन्द्र काब्य रहस्य प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट इफ्फीमध्ये प्रतिष्ठित आयसीएफटी – युनेस्को गांधी पुरस्काराच्या स्पर्धेत आहे. (IFFI 2023)

दिग्दर्शक सायंतन घोषाल म्हणाले, इफ्फीमधील पॅनोरमा अंतर्गत गांधी पुरस्कारासाठी चित्रपटाला नामांकन मिळणे ही आनंदाची गोष्ट आहे. निर्माता हिमांशू धनुका म्हणाले, चित्रपटाचा नायक प्रियांशू चॅटर्जी टागोरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे प्रतिनिधित्व करतो. समकालीन युगातील एका हत्येचे गूढ उकलण्याचा प्रवास सुरू करतो आणि दोन वेगवेगळ्या कालखंडात गुंफलेल्या कथेचा उलगडा करतो. हा चित्रपट रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेतील गूढ प्रांताला मानवंदना आहे, जो मानवी भावना आणि अस्मितेच्या गुंतागुंतीचा शोध घेतो. ते म्हणाले, प्रेक्षकांना खिळवून ठेवणार्‍या कथनात दोन कालखंड गुंफणारा हा चित्रपट रवींद्रनाथ टागोरांच्या चिरंतन श्लोकांप्रमाणेच हृदयावर आणि मनावर अमिट छाप सोडेल. हा चित्रपट पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला पश्चिम बंगाल आणि देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रवींद्र काब्य रहस्य हे त्या युगातील अनाम नायकांसाठी एक मानवंदना आहे. आणि टागोरांना विरोधक म्हणून रंगवण्याच्या प्रयत्नांमागील सत्य उलगडण्याचा उद्देश असल्याचेही त्यांनी नमूद केले.

IFFI 2023 : गूढ हत्येची कथा…

रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्यिक वारशाच्या काव्यात्मक टेपेस्ट्रीच्या पार्श्वभूमीवर चित्रित ’रबिन्द्र काब्य रहस्य’ एक कथा उलगडतो. ही कथा काळ आणि भावनांच्या सीमा ओलांडते. हा चित्रपट एक 100 वर्षांपूर्वीचा आणि एक सध्याच्या काळातील अशा दोन टाइमलाइन्समध्ये चित्रित गूढ हत्येची कथा आहे. शंभर वर्षांपूर्वी कवी एकलव्य सेन त्यांच्या समवयस्कांच्या फसवणुकीला बळी पडले, ज्यांनी निर्लज्जपणे त्यांच्या काव्यरचनांची चोरी केली. प्रतिशोध शोधण्यासाठी, एकलव्याने त्यांच्या मृत्यूची योजना आखली. काळाच्या विरोधातील शर्यतीत, कवी आणि जाणकार अभिक बोस हे रवींद्र संगीत गायिका हिया सेन सोबत एकत्र येतात आणि शंभर वर्षांपूर्वीचे रहस्य उलगडून दाखवतात, जे एका सूडबुद्धीच्या कवीच्या संदेशाने सुरू झाले होते. रवींद्रनाथ टागोरांच्या जीवनाचा प्रतिध्वनी करणार्‍या खुनांच्या जाळ्याची उकल करताना, भारताच्या सांस्कृतिक वारशाचा र्‍हास करण्याच्या अयशस्वी कारस्थान करणार्‍यांनी लपवलेल्या कलाकृती शोधून काढतात आणि इतिहासाला पुन्हा आकार देऊ शकणारे सत्य शोधून काढतात.

ही कथा बंगालच्या नयनरम्य परिसरात साकारली आहे, जिथे टागोरांच्या उद्बोधक कवितांमध्ये विणलेल्या संकल्पनात्मक धाग्यांचे प्रतिध्वनी, भिन्न जीवन एकत्र आले. निसर्गसौंदर्य आणि या प्रदेशातील गूढ मोहकतेच्या पार्श्वभूमीवर चित्रपट मानवी नातेसंबंध, आकांक्षा आणि आंतरिक सत्यांचा शोध घेत असलेल्या गुंतागुंतीचा शोध घेतो.

हेही वाचा

Back to top button