पणजी; प्रभाकर धुरी: हॉफमन्स फेयरी टेल्स हा रशियन भाषेतील चित्रपट असून टीना बरकालया यांचे दिग्दर्शन आणि पटकथा आहे. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर रशियामधील अशांत काळात, नादेझदा या मुलीच्या जीवनाचे चित्रण केले आहे. गोव्यात सुरू असलेल्या 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट प्रतिष्ठित सुवर्ण मयूर पुरस्कारासाठी स्पर्धा करत आहे. (54th IFFI)
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मार्गारीटा ग्रॅचेवा यांच्यावर झालेल्या क्रूर हल्ल्याची घटना टीना बारकलाया यांनी सामायिक केली. टीना यांनी सांगितले की – ग्रेचेवा या रशियन महिलेचे दोन्ही हात तिच्याशी दुर्व्यवहार करणाऱ्या तिच्या पतीने कापले होते. टीना बरकालया यांनी निदर्शनास आणले की 21व्या शतकातही, प्रत्येक देशात घरगुती हिंसाचार होतच आहे, मग तो भारत असो, जॉर्जिया असो किंवा रशिया असो. "ही कथा एक परीकथा असावी असे मला वाटत होते कारण परीकथांचा शेवट नेहमी आनंददायी होतो." (54th IFFI)
दिग्दर्शक टीना बारकालया म्हणाल्या की लघुपट आणि सांगीतिक व्हिडिओमधील त्यांच्या अनुभवाने त्यांना चित्रपट निर्मितीमध्ये जलद आणि प्रभावीपणे कसे काम करावे हे शिकवले. सिनेमा नक्षीकामासारखा असतो", सिनेमांमध्ये संगीत आणि पार्श्वसंगीत महत्त्वाचे असले तरी काही वेळा शांतता देखील अधिक प्रभावी ठरू शकते असे त्या म्हणाल्या. (54th IFFI)
याची कथा 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला घडताना दाखवली आहे. सोव्हिएत युग पाश्चात्य देशाची नकल करत असताना, चित्रपटात नादेझदा ही व्हिटालीशी विवाहबंधनात अडकलेली एक भित्री स्त्री आहे आणि अपार्टमेंटसाठी तो तिचे शोषण करत असतो. दोन नोकऱ्या करत असलेली नादेझदा हिचे जीवन बदलते, जेव्हा एका कोटचा मालक तिचे सुंदर, सर्जनशील हात पाहतो. तिचे जीवन नाट्यमयरित्या बदलते आणि ती एक लोकप्रिय हँड मॉडेल म्हणून उदयाला येते.