मकरंद अनासपूरे-तेजस्विनी लोणारी यांच्या ‘छापा काटा’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च | पुढारी

मकरंद अनासपूरे-तेजस्विनी लोणारी यांच्या ‘छापा काटा’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी नव्या कोऱ्या ‘छापा काटा’ चित्रपटातून धमाकेदार भूमिकेत येत आहेत. ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ धमाल विनोदी चित्रपटाचा २१ नोव्हेंबर २०२३ रोजी पोस्टर लॉन्च झाले. हा चित्रपट १५ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या –

‘ढ लेकाचा’ ‘कुलस्वामिनी’ ‘बोल हरी बोल’ आणि ‘हिरा फेरी’ या सुपरहिट चित्रपटांनंतर सुशीलकुमार अग्रवाल यांनी ‘छापा काटा’ चित्रपटाची निर्मिती केलीय. संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा आणि दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांच्यासोबत मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर हे कलाकार असतील.

छापा काटा चित्रपट
छापा काटा चित्रपट

Back to top button