Dunki : Drop 2- Lutt Putt Gaya Song: शाहरुखचा असा अंदाज पाहिला नसेल, डंकीचे पहिले गाणे रिलीज | पुढारी

Dunki : Drop 2- Lutt Putt Gaya Song: शाहरुखचा असा अंदाज पाहिला नसेल, डंकीचे पहिले गाणे रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता शाहरुख खान-तापसी पन्नूची जोडी डंकीमधून पाहायला मिळाली. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या डंकी चित्रपटातील पहिल्या गाण्याची डंकी ड्राप २ मधून पहिले रोमँटिक गाणे ‘लुट-पुट गया’ रिलीज झाले आहे. (Dunki : Drop 2- Lutt Putt Gaya Song) शाहरुख खान पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यास आणि बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड बनवण्याची तयारी करत आहेत. (Dunki : Drop 2- Lutt Putt Gaya Song)

संबंधित बातम्या –

या चित्रपटाची झलक तर फॅन्स शाहरुख खानच्या जन्मदिनी खास औचित्याने आपण पाहिली आहे. आता राजकुमार हिरानी ‘डंकी: ड्राप २’ मधून चित्रपटाचे पहिले गाणे समोर आणले आहे. गाणे आज रिलीज होणार असल्याची माहिती खुद्द शाहरुख खानने सोशल मीडियावर शायराना अंदाजात शेअर केली होती.

रिलीज झाले ‘डंकी: ड्राप २’ चे पहिले गाणे

शाहरुख खानचा चित्रपट ‘डंकी’ची जेव्हा पहिली झलक समोर आली होती, तेव्हा निर्मात्यांनी ‘ड्राप-१’ लिहिलं होतं. आता या चित्रपटाच्या पहिल्या गाण्यासोबत दुसरी झलक समोर आलीय.

शाहरुख खानने X अकाऊंटवर या गाण्याच्या काही ओळी लिहित म्हटले होते-“तेरे दिल में टेंट लगाऊंगा, तेरे इश्क में गोतेह खाऊंगा, मैं तो गया…लुट पुट गया। प्यार के इस सफर ‘डंकी’ को सिर्फ 30 दिन रह गए हैं”।

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

Back to top button