HBD Kartik Aryan : कार्तिकवर तरुणी का होतात फिदा? संपत्ती पाहाल तर... | पुढारी

HBD Kartik Aryan : कार्तिकवर तरुणी का होतात फिदा? संपत्ती पाहाल तर...

पुढारी ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडचा चॉकलेटी बॉय कार्तिक आर्यनला कोणत्या वेगळ्या ओळखीची गरज नाही. अभिनेता कार्तिकने कोणतेही चित्रपट बॅकग्राऊंड नसताना चित्रपट इंडस्ट्रीत शानदार अभिनयातून एक वेगळी ओळख निर्माण केली. ग्वालियारमध्ये जन्मलेल्या कार्तिक आर्यन आज २२ नोव्हेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. कार्तिक आर्यन लक्झरी लाईफस्टाईल जगतो. (HBD Kartik Aryan) अनेक तरुणी या हँडसम हंकवर फिदा आहेत. त्याच्या वाढदिवसाच्या औचित्याने त्याच्या संपत्तीबद्दल जाणून घेऊया. (HBD Kartik Aryan)

संबंधित बातम्या –

अभिनेता कार्तिकचे खरे नाव तिवारी असे आहे. कार्तिकने चित्रपटात येण्यापूर्वीच आपले वान कार्तिक आर्यन ठेवले होते. कार्तिकचा जन्म मध्यप्रदेशातील ग्वालियरमध्ये झाला. कार्तिकने डी वाय कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग नवी मुंबईतून बॉयोटेक्नोलॉजीमध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. पण, इंजिनिअरिंग सोडून तो चित्रपटांकडे वळला.

लक्झरी गाड्या आणि लक्झरी लाईफ

अभिनेता कार्तिक आर्यनला लक्झरी गाड्या आवडतात. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. एका रिपोर्टनुसार, ‘कार्तिक आर्यनकडे कारच्या कलेक्शनमध्ये साडे चार कोटी रुपयांची लम्बोर्गिनी आहे, ही गाडी इटलीतून आणण्यात आली होती. यासाठी त्याने ५० लाख रुपये अतिरिक्त शुल्क खर्च केले होते. त्याच्याकडे बीएमडब्ल्यू आणि ४४ लाख रुपयांची एक मिनी कूपरदेखील आहे. सोबतच रॉयल एनफिल्ड बाईकदेखील आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर कार्तिक आर्यन मुंबईत शिफ्ट झाला होता. वर्तमानमध्ये कार्तिक मुंबईतील वर्सोवा परिसरात राहतो. एका रिपोर्टनुसार, त्याच्या घरची किंमत जवळपास दीड कोटी रुपये सांगितली जाते. या घरात कार्तिक आपल्या संघर्षाच्या काळात पेईंग गेस्ट म्हणून राहत होता. २०१९ मध्ये त्याने हेच घर खरेदी केलं.

कार्तिक आर्यन चित्रपटाच्या माध्यमातून आणि एंडोर्समेंटमधून मोठी कमाई करतात. रिपोर्टनुसार, कार्तिक एका चित्रपटासाठी जवळपास पाच ते सात कोटी रुपये मानधन घेतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याची संपत्ती ४० कोटी रुपये आहे. कार्तिकचा आगामी चित्रपट ‘चंदू चम्पियन’ आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

Back to top button