Rakul Preet Singh : रकुलप्रीत सिंग बनलीय कंडोम टेस्टर! | पुढारी

Rakul Preet Singh : रकुलप्रीत सिंग बनलीय कंडोम टेस्टर!

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंगने (Rakul Preet Singh) तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. लवकरच ही अभिनेत्री ‘छत्रीवाली’ (Chhatriwali Movie) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रकुलप्रीत सिंग एक हटके अशा कंडोम टेस्टरच्या (condom tester) भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवालाने केली असून दिग्दर्शन तेजस प्रभास याचे आहे. घोषणा चित्रपटाच्या फर्स्ट लूकने चाहत्यांची उत्कंठा द्विगुणित केली आहे. ‘छत्रीवाली’च्या फर्स्ट लूकला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

अभिनेत्री रकुलप्रीत सिंग सध्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम करत आहे. अलीकडेच तिने तिच्या आगामी ‘छत्रीवाली’ चित्रपटाचा फर्स्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या चित्रपटाच्या घोषणेनंतर सोशल मीडियात खूप चर्चा असून फर्स्ट लूक शेअर केल्यानंतर पुन्हा एकदा चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. चित्रपटाचे लखनऊमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. छत्रीवाली हा एक सामाजिक कौटुंबिक मनोरंजन चित्रपट आहे. कर्नाल या छोट्या शहरातील रसायनशास्त्रातील पदवीधर बेरोजगार विद्यार्थितीनीची ही कथा आहे जी नोकरी न मिळाल्याच्या निराशेने कंडोम टेस्टर (condom tester) बनते.

चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करताना रकुल खूपच उत्साही होती. ती म्हणाली की ‘हा खूप मनोरंजक आणि वेगळा विषय आहे. माझ्या पात्राचा प्रवास सुरू करण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. काही मुद्दे हलक्याफुलक्या पद्धतीने अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे आणि मला ते मिळाले आहे. याविषयी मी खूप आनंदी आणि उत्साही आहे’.

छत्रीवाली हा आरएसव्हीपी प्रॉडक्शन (RSVP) हाऊसचा एक विचित्र चित्रपट आहे. जो वेगळ्या धाटणीची संकल्पना असणारा चित्रपट आहे. यातून प्रेक्षक काहीतरी शिकतील आणि चित्रपटात दाखवण्यात आलेली थीमही लोक स्वीकारतील असा अंदाज वर्तवला जात आहे. चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक तेजस देवस्कर यांनी सांगितले की ‘आमचा चित्रपट हा एक सामाजिक कौटुंबिक मनोरंजन आहे ज्याचा उद्देश कंडोमच्या वापराविषयीची नकारात्मकता दूर करणे आहे आणि आम्ही या चित्रपटाबद्दल खरोखर उत्साहित आहोत.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

Back to top button