Prithviraj Teaser: अक्षय-मानुषी छिल्लर यांची जबरदस्त झलक | पुढारी

Prithviraj Teaser: अक्षय-मानुषी छिल्लर यांची जबरदस्त झलक

पुढारी ऑनलाईन :

यशराज फिल्म्सची निर्मिती असलेल्या ‘पृथ्वीराज’ या चित्रपटाचा पहिला टीझर सोमवारी प्रदर्शित करण्यात आला. (Prithviraj Teaser) चित्रपटात अभिनेता अक्षयकुमार याने सम्राट पृथ्वीराज ही भूमिका साकारली आहे. तर माजी विश्‍वसुंदरी मानुषी छिल्लर हिने राणी संयोगिता ही भूमिका साकारली आहे. मानुषी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रपटात संजय दत्त क्रूरकर्मा मोहम्मद घोरीच्या भूमिकेत आहे. याशिवाय सोनू सूद, आशुतोष राणा, साक्षी तन्वर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.(Prithviraj Teaser)

चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. त्यांनी चाणक्याचे महाचरित्र टेलिव्हिजनवर दिग्दर्शित केले होते. यापूर्वी ‘पिंजर’ चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. २१ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सम्राट पृथ्वीराज यांचे जीवन आम्ही प्रामाणिक पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट त्यांच्या अजोड साहस आणि बहादुरीला दिलेली श्रद्धांजली आहे, असे अक्षयकुमारने सांगितले.

दरम्यान, या टीझरनंतर अनेक नेटकर्‍यांनी अक्षयकुमारला ट्रोलही केले आहे. अक्षयचा लूक त्याच्या ‘हाऊसफुल’ चित्रपटातील ‘बाला’सारखा असून भूमिकेसाठी अक्षयने आवाजावरही काम केले नसल्याचे अनेक नेटकर्‍यांचे म्हणणे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar)

Back to top button