Arjun Rampal Money Heist: अर्जुन रामपाल साकारणार देशी ‘मनी हाईस्ट’चा प्रोफेसर! | पुढारी

Arjun Rampal Money Heist: अर्जुन रामपाल साकारणार देशी ‘मनी हाईस्ट’चा प्रोफेसर!

मुंबई; पुढारी ऑनलाईन : arjun rampal money heist : चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चित्रपट निर्माता जोडी अब्बास-मस्तान लवकरच मनी हाईस्ट या ब्लॉकबस्टर हिट वेब सीरिजच्या कथेवर आधारित चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाचे शूटिंग डिसेंबरपासून सुरू होणार असून त्यासाठी कास्टिंगचे कामही सुरू झाले आहे. आता सर्वात उत्सुकतेचा विषय आहे तो म्हणजे मूळ स्पॅनिश मनी हाईस्ट वेब सीरिजमधल्या प्रोफेसरची भूमिका हिंदीत कोण साकारणार? या प्रश्नावरचा पडदा उठला आहे. अभिनेता अर्जुन रामपाल लोकप्रिय पात्र प्रोफेसरच्या भूमिकेत दिसणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

अलीकडेच, चित्रपट निर्मात्यांशी पिंकविला या वेबसाईटने संवाद साधला यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, अर्जुन रामपालला स्पॅनिश मनी हाईस्ट वेब सीरिजमधील प्रोफेसरच्या भूमिकेसाठी कास्ट केले जात आहे. तर मुस्तफा (अब्बासचा मुलगा) आणि इतर दोन कलाकार इतर भूमिका साकारतील. प्रोफेसरसोबतची इतर तिन्ही पात्रे वेगळ्या पद्धतीने मांडली जातील.

चित्रपटाचे नाव ‘थ्री मंकी’ (arjun rampal money heist)

इंटरनॅशनलने थ्रिलर्स चित्रपटांचा रिमेक करण्यात अब्बास-मस्तान या जोडीने प्रभुत्व मिळवले आहे. ही जोडी मनी हाईस्टला शक्य तितक्या चांगल्या प्रकारे सादर करेल अशी अशा आहे. या चित्रपटाचे शीर्षक थ्री मंकी असे ठेवण्यात आले आहे. चित्रपटाचे शूटींग मुंबईसह अनेक ठिकाणी केले जाईल. २०२२ च्या उत्तरार्धात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अब्बास-मस्तान जोडीने पाच वर्षांपूर्वी मशीन हा चित्रपट बनवला होता. अब्बास यांचा मुलगा मुस्तफा बर्मावाला याला या चित्रपटातून लॉन्च करण्यात आले. मशीन चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकला नाही. त्यानंतर आता अब्बास-मस्तान देशी मनी हाईस्ट घेऊन पुनरागमन करत आहेत. मनी हाईस्ट ही एक स्पॅनिश वेब सीरिज आहे. ज्याला जगभरासह भारतातील प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे. या वेब सीरिजला डोक्यावर घेतले. आता या वेब सीरिजची कथा चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. मूळ मनी हाईस्टमध्ये अल्वारो मॉर्टेने प्रोफेसरची भूमिका साकारली होती. जे सर्वात लोकप्रिय ठरले आहे.

Back to top button