जूही चावला आधी आर्यनसाठी जामीनदार आणि आज बर्थडेला दिलं जबरा गिफ्ट ! | पुढारी

जूही चावला आधी आर्यनसाठी जामीनदार आणि आज बर्थडेला दिलं जबरा गिफ्ट !

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलीवूड चित्रपट अभिनेत्री जूही चावला हिनेवाढदिवसानिमित्त आर्यन खानला एक खास भेट दिली आहे. खुद्द अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवरून ही माहिती दिली आहे. चित्रपट अभिनेत्रीने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आर्यन खानचा बालपणीचा फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोमध्ये आर्यन खान त्याच्या मित्रांसोबत फोटो क्लिक करताना दिसत आहे. फोटोत आर्यन खानसोबत सुहाना खानही दिसत आहे.

हा फोटो शेअर करत जूही चावला हिने लिहिले आहे की, ‘आजच्या खास प्रसंगी आमच्या वैयक्तिक अल्बममधून… हॅपी बर्थडे आर्यन. वर्षानुवर्षे तुझ्यासाठी आमच्या शुभेच्छा नेहमीच राहिल्या आहेत. तुला खूप प्रेम आणि आशीर्वाद मिळो, देव तुला योग्य मार्ग दाखवो. तुला खूप खूप प्रेम आणि तुझ्या नावाने ५०० झाडे लावण्याची शपथ घेतो.

जूही चावला आर्यन खानची जामीनदार

चित्रपट अभिनेत्री जुही चावला ही सुपरस्टार शाहरुख खानची अनेक वर्षांपासून मैत्रीण आहे.

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने पकडलेल्या आर्यन खानला जेलमधून बाहेर काढण्यात अभिनेत्री जुही चावलाचा मोठा वाटा आहे.

जूही चावला आर्यन खानसाठी जामीनदार आहे. अभिनेत्री कोर्टात पोहोचली होती आणि आर्यन खानच्या सुटकेसाठी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर तिने स्वाक्षरी केली होती.

शाहरुख खान आणि जुही चावला यांचे कुटुंबीय अनेक वर्षांपासूनचे मित्र आहेत.

हे ही वाचलं का?

Back to top button