Operation Valentine : मानुषी छिल्लरचे तेलुगु इंडस्ट्रीत पदार्पण, वरुण तेजसोबत दिसणार | पुढारी

Operation Valentine : मानुषी छिल्लरचे तेलुगु इंडस्ट्रीत पदार्पण, वरुण तेजसोबत दिसणार

पुढारी ऑनलाईन डेस्क – मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड आणि फॅशन आयकॉन म्हणून ओळखली तर जाते. (Operation Valentine) आता ती प्रसिद्ध अभिनेते वरुण तेजसोबत “ऑपरेशन व्हॅलेंटाईन” या चित्रपटातून तेलुगू इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. शक्ती प्रताप हांडा दिग्दर्शित हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Operation Valentine)

नुकतेच तिने चित्रपटाचे शूट पूर्ण केले आहे. मानुषी वायुसेनेमध्ये रडार कंट्रोलरच्या भूमिेकेत दिसणार आहे आणि वरुण तेज पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. दीपिका पदुकोण आणि जान्हवी कपूर सारख्या बॉलिवूड अभिनेत्रींनी देखील दक्षिणेत पदार्पण केले आहे.

रिलीजची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी “ऑपरेशन व्हॅलेंटाईन” बद्दल ची उत्सुकता वाढली आहे. चाहते मानुषी छिल्लरच्या अभिनयाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar)

Back to top button