Laxmikant berde यांच्या मृत्यूनंतर धायमोकलून रडला होता सलमान खान

Salman Khan-Laxmikant berde
Salman Khan-Laxmikant berde

पुढारी ऑनलाईन डेस्क : लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant berde) यांचा आज जन्मदिवस. मराठी सोबत हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा डंका त्यांनी वाजवला. सलमान खानचा चित्रपट 'मैंने प्यार किया'मधून त्यांनी बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. पुढे हम आपके हैं कौनमध्येही सलमान-लक्ष्मीकांत यांच्या जोडीने एकत्र काम केलं होतं. या द्वयींची खूप जवळीक होती. दोघांची चांगली मैत्री होती. लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतर सलमान खानलादेखील आपले अश्रू थांबवता आले नाही. (Laxmikant berde )

संबंधित बातम्या –

'साजन', 'हम आपके हैं कौन', 'अनाडी', 'बेटा' यासारख्या हिंदी चित्रपटांत अनेक शानदार भूमिका साकारल्या होत्या. मराठी स्टार बेर्डे यांनी जेव्हा हिंदी चित्रपटांमध्ये काम करणे सुरू केले, तेव्हा तिथेही त्यांनी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. बेर्डे यांनी १९८९ मध्ये हिंदी चित्रपट 'मैंने प्यार किया' मधून डेब्यू केलं होतं. 'मैंने प्यार किया' सलमान खानचा दुसरा चित्रपट होता. सूरज बडजात्या यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटामध्ये सलमान खानशिवाय भाग्यश्री पटवर्धन आणि लक्ष्मीकांत बेर्डेदेखील प्रमुख भूमिकेत होते.

लक्ष्मीकांत यांच्यासोबत सलमानचा हा पहिला चित्रपट होता. हिंदी चित्रपटामध्ये '100 डेज', 'हम आपके हैं कौन' यासारख्या हिट चित्रपटांचा समावेश आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आपल्या कॉमेडीने सर्वांना मागे टाकत होते. बेर्डे यांनी चित्रपटांशिवाय, काही टीव्ही शोमध्येदेखील काम केलं होतं. चित्रपट 'धूमधडाका'ने लक्ष्मीकांत यांना रातोरात स्टार बनवलं होतं. मराठी आणि हिंदी करिअर मिळून बेर्डे यांनी २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

हिंदी चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांची साईड भूमिका होती. पण तरीही इतरांपेक्षा त्यांची भूमिका दमदार होती. सलमानच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी नोकराची भूमिका साकारली. पण, जबरदस्त अभिनयाने ते हिरो बनले. त्यांच्या सर्वात हिट चित्रपटांमध्ये 'धूमधडाका' आणि 'अशी ही बनवाबनवी' मैलाचे दगड ठरले होते.

२००४ लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन झाले होते. जेव्हा सलमान खानला निधनाचे वृत्त समजले, तेव्हा सलमान खानला अश्रू अनावर झाले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news