Marathi Film : निराळ्या संकल्पनेवर आधारित “८ दोन ७५” चित्रपट यादिवशी

८ दोन ७५ चित्रपट
८ दोन ७५ चित्रपट

पुढारी ऑनलाईन डेस्क – एका महत्त्वाच्या आणि संवेनशील विषयावर आधारित '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' हा अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या चित्रपटाची चर्चा होत आहे. (Marathi Film) देहदान ही संकल्पना आणि त्याबाबत जागृती करणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार आहे. (Marathi Film)

संबंधित बातम्या –

उदाहरणार्थ या निर्मिती संस्थेचे सुधीर कोलते, विकास हांडे, लोकेश मांगडे हे ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाचे निर्माते आहेत, तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाची पटकथा शर्वाणी – सुश्रुत यांनी लिहिली आहे, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे.

अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे – विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी, अनुष्का पिंपुटकर, अक्षय मिटकल अशी चित्रपटाची दमदार स्टारकास्ट असून अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे.

चित्रपटाच्या नावामुळे आणि टीजर प्रदर्शित केल्यापासून चित्रपटाविषयी उत्सुकता आहे. त्याशिवाय आजवर फ्रान्स , सर्बिया, सिंगापूर युनायटेड स्टेट्स, भूतान, यूगोस्लाव्हिया, इटली येथील आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल्स सह भारतात, पोंडेचेरी, कलकत्ता, हिमाचल प्रदेश, मुंबई, उटी, सिक्कीम येथील चित्रपट महोत्सवांमध्ये ९० पेक्षाही अधिक पुरस्कार मिळवण्याची दमदार कामगिरी या चित्रपटाने केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news