Apurva First Look : तारा सुतारियाचा थ्रिलर ‘अपूर्वा’चा पहिला लूक, रिलीज डेट समोर | पुढारी

Apurva First Look : तारा सुतारियाचा थ्रिलर 'अपूर्वा'चा पहिला लूक, रिलीज डेट समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ मधून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारी अभिनेत्री तारा सुतारिया नविन चित्रपट घेवून येत आहे. या चित्रपटाचे नाव ‘अपूर्वा’ असे आहे. निखिल नागेश भट्ट दिग्दर्शित ‘अपूर्वा’ या चित्रपटात तारासोबत अभिषेक बनर्जी, धैर्य करवा आणि राजपाल यादव यांनी भारदस्त भूमिका साकारल्या आहेत. ‘अपूर्वा’ चित्रपट लवकरच डिस्ने हॉटस्टारवर चाहत्यांसाठी सज्ज झाला आहे. दरम्यान चित्रपटातील धमाकेदार एकापेक्षा एक लूक ( Apurva First Look ) आणि रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहेत.

संबंधित बातम्या 

अभिनेत्री तारा सुतारियाने तिच्या इंन्स्टाग्रामवर आगामी ‘अपूर्वा’ चित्रपटातील पहिला आणि खतरनाक लूक ( Apurva First Look ) शेअर केला आहे. यात ती हातात रक्ताने माखलेला विळा घेवून रागात पाहत असल्याचे दिसतेय. यावरून ती चित्रपटात अन्यायाविरोद्ध पेटून उटलेली दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमधून तिने चित्रपटाची रिलीज डेटची घोषणा केली आहे.

‘बाहेर येण्याचा कोणताही मार्ग नसतो तेव्हा अपूर्वा आत जाते असते. ‘अपूर्वा’ हा थ्रिलर चित्रपट १५ नोव्हेंबरला तुमच्या स्क्रीनवर येण्यापूर्वीचा तुमचा पहिला लूक. @disneyplushotstar 🖤 वर’. असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. यावरून ताराचा हा चित्रपट येत्या १५ नोव्हेंबर रोजी डिस्ने हॉटस्टारवर येणार असल्याची माहिती मिळत आहे.

याच दरम्यान ‘अपूर्वा’ चित्रपटातील अभिषेक बनर्जी आणि राजपाल यादव यांचा ही पहिला लूक समोर आला आहे. यात दोघाजमाच्या मागे एक महिला हातात विळा घेवून उभी असलेली दिसतेय. तर अभिषेक बनर्जीच्या हातात काठी दिसत आहे. य़ा फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘अस्तित्वासाठीची अपूर्वीची ही लढाई तुम्हाला प्रश्न उपस्थित करण्यास भाग पाडत आहे….’ असे लिहिले आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी चित्रपटासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by TARA💫 (@tarasutaria)

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

Back to top button