Leo Collection : थलपती विजयच्या ‘लिओ’ ने तोडला विक्रम; वर्ल्‍डवाइड ४३० कोटींची कमाई

Leo Collection
Leo Collection
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेता थलपती विजयच्या 'लिओ' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत जगभरात वर्ल्‍डवाइड ४३० कोटींचा ( Leo Collection ) टप्पा ओलांडला आहे. या चित्रपट विजयचे धमाकेदार ॲक्शन सीन दाखवण्यात आलं आहे. या कमाईमुळे लोकेश कनागराज सिनेमॅटिक युनिव्हर्सचा सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. 'लिओ' नं अभिनेता कमल हसनच्या 'विक्रम' ला मागे टाकले आहे.

संबंधित बातम्या 

अभिनेता थलपती विजयचा 'लिओ' हा चित्रपट १९ ऑक्टोबर रोजी थिअटरमध्ये चाहत्यांच्या भेटीस आला. पाच दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात वर्ल्‍डवाइड ४३० कोटी रूपयांचा ( Leo Collection ) टप्पा पार केला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने ६४. ८० कोटी रुपयांचे कलेक्शन करत ओपनिंग केलं. मिळालेल्या माहितीनुसार, 'लियो' चित्रपटाने पहिल्या सोमवारी ३५. १९ कोटी रुपयांची, रविवारी वीकेंडला ४१. ५५ कोटींची कमाई केली. पाच दिवसांत 'लिओ'नं देशात एकूण २१६.५९ कोटी रुपयांचे भरघोष अशी कमाई केली आहे.

सोमवारी तमिळ भाषेतील चित्रपटाने ३०.४९ कोटींची कमाई केली. तेलुगूत २. ८६ कोटींची, हिंदीत १.८४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. गेल्या पाच दिवसांत या चित्रपटाने एकूण १७६.६९ कोटींचा टप्पा पार केला आहे. 'लिओ' चित्रपट तमिळ, तेलुगू, हिंदी आणि कन्नडमध्ये रिलीज झाला आहे.

थलपथी विजयसोबत चित्रपटात संजय दत्त, अर्जुन सर्जा आणि त्रिशा यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचे बजेट ३५० कोटी रुपयांचे आहे. तर या चित्रपटाने पाच दिवसात वर्ल्‍डवाइड १६५ कोटी रुपयांचे कमाई केली आहे. तर देशातील एकूण २६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यावरून पाच दिवसांत या चित्रपटाने जगभरात ४३० कोटी रुपयांचे कमाई केली आहे. याच दरम्यान लिओ' ने अभिनेता कमल हसनच्या 'विक्रम' लादेखील मागे टाकले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news