Shilpa Shetty : ‘अब सायरन बाजेगा…’; शिल्पा दिसणार ‘इंडियन पोलीस फोर्स’ मध्ये | पुढारी

Shilpa Shetty : 'अब सायरन बाजेगा...'; शिल्पा दिसणार 'इंडियन पोलीस फोर्स' मध्ये

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘इंडियन पोलीस फोर्स’ या वेबसीरिजमधून ओटीटी पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. या आकर्षक शोमध्ये शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार असून वेबसीरिजमध्ये पोलिस दलासमोरील अनेक आव्हानं पेलण्यासाठी तयार आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि विवेक ओबेरॉय या वेबसीरिजमध्ये दिसमार आहे. शिल्पा एक पोलिस अधिकारी म्हणून तिची भूमिका साकारणार असून ही वेबसीरीज OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या 

शिल्पा शेट्टीने अलीकडेच तिच्या सोशल मीडियावर या बेवसीरीजच्या रिलीजची तारीख जाहीर करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ‘अब सायरन बाजेगा तो समझो अपराध की बँड बाजेगी. आ गया पोलीस! 🚔 #PoliceCommemorationDay वर आपल्या भारतीय पोलिसांना अभिवादन करत हा शो त्यांच्या शौर्याला, निःस्वार्थ सेवेला, अटूट बांधिलकीला आणि उग्र देशभक्तीला श्रद्धांजली आहे. #IndianPoliceForceOnPrime, 19 जानेवारी @primevideoin वर.”

‘इंडियन पोलीस फोर्स’ ही बेवसीरीज रोहित शेट्टी पिक्चर्सद्वारे निर्मित आहे. ही वेबसारीज १९ जानेवारी २०२४ पासून ॲमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. शिल्पा शेट्टी रोहित शेट्टीच्या कॉपवर्समध्ये स्वतःचे वेगळे आकर्षण कसे आणतील हे पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Back to top button