Dalip Tahil Jail : अभिनेता दलीप ताहिल यांना तुरुंगवासाची शिक्षा!

Dalip Tahil  Jail : अभिनेता दलीप ताहिल यांना तुरुंगवासाची शिक्षा!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Dalip Tahil Jail : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते दलीप ताहिल यांबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. या 65 वर्षीय अभिनेत्याला दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ताहिल यांना पाच वर्षांपूर्वीच्या जुन्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण 2018 सालचे आहे.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

90 च्या दशकामध्ये अनेक चित्रपटांमधील खलनायकाच्या भूमिकेमुळे घरोघरात ओळखीचा चेहरा झालेल्या दलीप ताहिल यांनी 2018 मध्ये केलेल्या गुन्ह्यासाठी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. दलीप ताहिल यांनी मद्यपान करुन गाडी चालवताना एका रिक्षाला जोरदार धडक दिली होती. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली होती. हा अपघात मुंबईतील खार येथे घडला होता. ताहिल यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. पण त्यांची जामिनावर सुटका झाली. तो खटला सुरूच होता. अशा परिस्थितीत आता त्या खटल्याचा निकाल आला आहे. ज्यात अभिनेत्याला दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता ताहिल यांना ही शिक्षा भोगणे किंवा या निर्णयाविरोधात वरिष्ठ कोर्टामध्ये अर्ज करणे असे 2 पर्याय आहेत.

डॉक्टरांच्या अहवालानुसार निकाल

या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास करुन सर्व पुरावे कोर्टासमोर सादर केला. वैद्यकीय अहवालामध्ये दलीप ताहिल यांनी मद्यपान केले होते असे स्पष्ट झाले. ताहिल हे अपघात झाला तेव्हा कार चालवण्याच्या अवस्थेत नव्हते. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीच्या अहवालामध्ये दलीप ताहिल यांच्या तोंडातून मद्यप्राशन केल्याने दुर्गंधी येत होती, त्यांचे डोळे लाल झाले होते, ते बोलतानाही अडखळत होते. अशा अवस्थेतच ते कार चालवत होते असं नमूद केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news