सलमान खानच्या ‘वीरगती’चे निर्माते बाबूभाई लाटीवाला यांचे निधन | पुढारी

सलमान खानच्या 'वीरगती'चे निर्माते बाबूभाई लाटीवाला यांचे निधन

पुढारी ऑनलाईन : सलमान खानच्या ‘वीरगती’ चित्रपटाची निर्मिती करणारे निर्माते बाबूभाई लाटीवाला यांचे दुःखद निधन झाले आहे. पहाटे त्यांनी 2 वाजता अखेरचा श्वास घेतला. बॉम्बिनो या प्रायव्हेट कंपनीने वीरगतीची निर्मिती केली. तर 1998 तिरछी टोपीवाले हा सिनेमा लिहिला होता. दुपारी चारनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. बाबूभाई लाटीवाला यांची निर्मिती असलेला असलेला वीरगती सिनेमा हा अजय नावाच्या अनाथ मुलावर बेतलेला आहे.

एका हवालदाराने त्याला दत्तक घेतल्यानंतर घेतल्यानंतरचं त्याचं आयुष्य आणि संघर्ष या सिनेमात दाखवला आहे. या सिनेमात दिव्या दत्ता, अतुल अग्निहोत्री, हिमानी शिवपुरी, फरीदा जलाल, पूजा डडवाल, सुदेश बेरी आणि सुधीर पांडे हे देखील दिसले होते. वीरगती तिच्या आकर्षक सादरीकरणामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. बाबूभाई लाटीवाला हे एक दूरदृष्टि असणारे निर्माते होते. त्यांनी तिरछी टोपीवाले या सिनेमाची निर्मिती केली. याशिवाय गोविंदा आणि वर्षा उसगांवकरची भूमिका असलेला ‘बेटा हो तो ऐसा’ या सिनेमाची निर्मितीही त्यांनी केली. सलमानला लव्हर बॉय इमेजपासून बाहेर काढून अॅक्शन हिरो म्हणून समोर आणण्याचं काम वीरगती सिनेमाने केलं.

हेही वाचा : 

Back to top button