राजस्थान विधानसभा निवडणूक : काँग्रेसच्‍या पहिल्‍या यादीत गहलाेत, पायलट | पुढारी

राजस्थान विधानसभा निवडणूक : काँग्रेसच्‍या पहिल्‍या यादीत गहलाेत, पायलट

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज (दि. २१) पहिली यादी जाहीर केली. ३३ उमेदवारांच्‍या यादीत काँग्रेसने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना सरदारपुरामधून तर माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना टोंकमधून उमेदवारी दिली आहे.

राजस्थान विधानसभेची सदस्यसंख्या २०० इतकी आहे. काँग्रेसनं पहिल्या टप्प्यात ३३ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या पहिल्या यादीत अशोक गहलोत, सचिन पायलट आणि सी.पी. जोशी यांच्‍या नावाचा समावेश आहे. विधानसभेचे अध्यक्ष सीपी जोशी यांना नाथद्वारातून, तर आरपीसीसीचे प्रमुख गोविंद सिंग दोतासारा यांना लक्ष्मणगडमधून उमेदवारी देण्‍यात आली आहे.

शुक्रवारी दौसा येथील सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री गेहलोत यांनी जिल्ह्यातील सर्व विद्यमान आमदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. गेहलोत यांनी दौसा जिल्ह्यातील काँग्रेसचे विद्यमान आमदार- परसादी लाल मीना, ममता भूपेश, मुरारी लाल मीना, जीआर खटाना यांचे नाव देखील दिले आणि लोकांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले हाेते.

Back to top button