Kangana Ranaut : कंगनाच्या घरी चिमुकल्या पाहूण्याचे आगमन; पहा ‘तो’ कोण आहे | पुढारी

Kangana Ranaut : कंगनाच्या घरी चिमुकल्या पाहूण्याचे आगमन; पहा 'तो' कोण आहे

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ( Kangana Ranaut ) तिचे स्पष्टपणे मत मांडताना आणि वादग्रस्त व्यक्तव्याने नेहमी चर्चेत असते. सध्या कंगना तिच्या व्यक्तव्याने नव्हे तर तिच्या कुंटूंबियात एका नव्या पाहूण्याच्या आगमनाने चर्चत आली आहे. कंगनाचा भाऊ अक्षत राणावतची पत्नी रितू राणावतने एका गोडस मुलाला जन्म दिला आहे. ही गुडन्यूज कंगनाने फोटो शेअर सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या फोटोंवर सोशल मीडियातून कॉमेंन्टसचा पाऊस पडत आहे.ॉ

संबंधित बातम्या 

अभिनेत्री कंगना राणावतने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतेच बाळासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कंगनाची आई आशा राणावत, बहीण रंगोली चंदेल आणि भाऊ अक्षत राणवत आनंदात दिसत आहेत. तर रितू राणावतसोबतही तिचे चिमुकले दिसत आहे. यामुळे राणावत कुंटुंबियात नव्या पाहूण्याचे आगमन झाल्याने सर्वजण उत्साहात आणि आनंदात आहेत. हे फोटो शेअर करून कंगनाने अक्षत आणि त्याच्या पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये कंगनाने लिहिले आहे की, ‘आजच्या दिवशी आनंदाच्या क्षणी आमच्या कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन झाले आहे. माझा भाऊ अक्षत राणावत आणि त्याची पत्नी रितू रामावत यांनी मुलगा झाला आहे. कुटुंबियांनी बाळाचे नाव ‘अश्वथामा’ ठेवलं आहे. तुम्ही सर्वांनी आमच्या कुटुंबातील नवीन पाहूण्याला आशीर्वाद द्यावा…’ असे म्हटलं आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसोबत बॉलिवूड स्टार्सही भऱभरून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कंगना नेहमी तिच्या वादग्रस्त व्यक्तव्याने चर्चेत असते, परंतु, आता तिच्या कुंटूबियातील गुडन्यूज दिल्यामुळे तिचे चाहत्यांनी कौतुक केलं आहे. कंगना सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

Back to top button