मराठी कलाकारांनी घेतले कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन | पुढारी

मराठी कलाकारांनी घेतले कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूरच्या दिशेने स्वारी निघाली की, कोल्हापूरची देवी अंबाबाईचं दर्शन घेतल्याशिवाय दौरा पूर्ण होऊच शकत नाही. देवीच्या दर्शनासाठी आपसूक सर्वांची पाऊलं मंदिराच्या दिशेने वळू लागतात. ‘सन मराठी’ वाहिनीच्या कलाकारांनीदेखील अंबाबाईचे दर्शन घेऊन नात्यांचा सोहळा साजरा केला.

संबंधित बातम्या – 

या वाहिनीवरील ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’, ‘सुंदरी’ आणि ‘सावली होईन सुखाची’ या तीन मालिकेतील कलाकारांनी कोल्हापूरात विविध ठिकाणी हजेरी लावली.

संबंधित बातम्या

‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ मालिकेत ‘वेतोबा’ची भूमिका साकारणारा अभिनेता उमाकांत पाटील, ‘सुंदरी’ मालिकेतील नायिका आरती बिराजदार, स्वाती लिमये आणि ‘सावली होईन सुखाची’ मालिकेचा अभिनेता रौनक शिंदे या कलाकारांनी सर्वात प्रथम अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि प्रत्येकाने त्यांच्या मालिकेच्या यशस्वी वाटचालीसाठी प्रार्थना केली.

कोल्हापुरातील इतर ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या. कलाकारांनी प्रेक्षकांसोबत छान गप्पा केल्या. कोल्हापूरमध्ये घालवलेल्या एक अन एक क्षणांचा आनंद या कलाकारांनी मनापासून लुटला आणि पुन्हा एकदा कोल्हापूरला येण्याची इच्छा बोलून दाखवली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sun Marathi (@sunmarathi)

Back to top button