Aamir Khan : आमिरने घेतला मोठा निर्णय; ‘या’ कारणामुळे सोडली कर्मभूमी मुंबई | पुढारी

Aamir Khan : आमिरने घेतला मोठा निर्णय; 'या' कारणामुळे सोडली कर्मभूमी मुंबई

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानबद्दल ( Aamir Khan ) एक मोठी अपडेट समोर आली आहे. आमिरने एक मोठा निर्णय घेतला असून लवकरच कर्मभूमी मुंबई सोडणार असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे येत्या दोन महिन्यांत आमिर चेन्नईला शिफ्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. चेन्नईला शिफ्ट होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची आई झीनत हुसैन असल्याचे स्पष्ट होत आहे.

संबधित बातम्या

नुकतेच पार पडलेल्या एका मुलाखतीत आमिरच्या ( Aamir Khan ) जवळच्या नातेवाईकांने सांगितले की, आमिर खान प्रथम त्याच्या कुंटूंबियाना प्राधान्य देतो. त्याचे कुंटूबिय चेन्नईत राहते. दरम्यान आमिरची आई झीनत हुसैन यांच्यावर तेथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यामुळे आमिरला त्याच्यासोबत वेळ घालवायचा असल्याने तो मायानगरी मुंबई सोडत असल्याची माहिती मिळत आहे. या कारणामुळे आमिर आता चेन्नईला शिफ्ट होण्याचा विचार करत असल्याचीही बोलले जात आहे.

तर झीनत हुसैन यांच्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयाजवळील एका हॉटेलमध्ये आमिर राहणार आहे. आमिरने नेहमीच त्याच्या कामासोबत कुटुंबालाही वेळ प्राधान्य देत असतो. आमिरला त्यांची मुलगी इरा खान खूप जवळ आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास आमिरने आगामी ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट त्याच्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटावर आधारित आहे. आमिरचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट पुढील वर्षी २०२४ रोजी रिलीज होणार आहे. आमिरच्या या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aamir Khan (@amirkhanactor_)

Back to top button