‘खरंच तिचं काय चुकलं?’ मध्ये रोशन विचारे मुख्य भूमिकेत | पुढारी

'खरंच तिचं काय चुकलं?' मध्ये रोशन विचारे मुख्य भूमिकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांना आपलंसं करणारा एक गोड चेहरा म्हणजे, रोशन विचारे होय. अलीकडेच आलेल्या ‘खरंच तिचं काय चुकलं?’ या सोनी मराठीवरील रहस्यमय मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता रोशन विचारे याला पाहायला मिळणार आहे. रोशनने आजपर्यंत साकारलेल्या अनेक भूमिकांपैकी ‘खरंच तिचं काय चुकलं?’ या मालिकेतील त्याची भूमिका काहीशी वेगळी आहे. श्रेयस अग्निहोत्री… गडगंज श्रीमंत होतकरू तरुण… आभा निवासचा एकुलता एक वारस, अशी ख्याती असणारी ही व्यक्तिरेखा रोशनने अभिनयातून उत्तमरीत्या साकारत आहे.

संबंधित बातम्या 

अग्निहोत्रींच्या घरची सून आभाच व्हायला हवी, अशी तिच्या आईची इच्छा आहे. निवासची खरी मालकीण आभाच आहे, हे वेळोवेळी अधोरेखितही केलं गेलं आहे. पण श्रेयसच्या मनाची मालकीण कोण आहे.. आभा की कुहू..? हे एक कोडंच आहे. आभा निवासशी आभाचा काय संबंध आहे, याचं रहस्य अजूनही उलगडलेलं नसताना आभा आणि कुहू या दोन बहिणींच्या आयुष्यात झालेला श्रेयसचा प्रवेश आणखी पेच वाढवणारा ठरणार आहे.

श्रेयसच्या येण्याने या मालिकेत प्रेमाचे रंग भरले जाणार हे निश्चित. मालिकेत प्रसंगागणिक सातत्याने गडद होत जाणाऱ्या छटांमध्ये अग्निहोत्रीच्या भूमिकेत रोशन- श्रेयस काय रंग भरतो, हे पाहणे आता रंजक ठरणार आहे. अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या ‘खरंच तिचं काय चुकलं?’ या मालिकेत रोज एका रहस्याचा डाव मांडला जात आहे. त्यातले काही छुपे गूढ पत्ते एक-एक करून आपल्या मनाचा ठाव घेणार आहेत. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button