Allu Arjun National Award : पुरस्कारानंतर अल्लू अर्जुनच्या पत्नीने असं काही केलं की…

Allu Arjun National Award
Allu Arjun National Award

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ स्टार अल्लू अर्जुनला ( Allu Arjun National Award ) ६९ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार त्याला 'पुष्पा' या ब्लॉकबस्टर चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी प्रदान करण्यात आला आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. दरम्यान, या खास प्रसंगी अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डीने सोशल मीडियावर त्याचे भरभरून कौतुक करताना एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केलाय.

संबधित बातम्या 

अभिनेता अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डीने तिच्या इंन्टाग्रावर पुरस्कार सोहळ्याला जाण्यापूर्वीचे काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या पहिल्या फोटोत स्नेहा अल्लू अर्जुनला कार्यक्रमासाठी तयार होण्यास मदत करताना दिसत आहे, तर दुस-या फोटोत ते दोघेजण एकमेंकाचे हात धरून सोहळ्याकडे जाताना दिसत आहेत. दरम्यान या फोटोत रूममधील साहित्य आणि बाजूला काही रूमचे बंद दरवाजे दिसत आहेत. या खास सोहळ्यासाठी अल्लूने व्हाईट रंगाचा एथनिक सूट आणि स्नेहाने ब्राऊन गोल्डन रंगाचा सलवार परिधान केला होता. यावेळी दोघेजण खूपच ग्लॅमरस दिसत होते.

अल्लूचे कौतुक करताना स्नेहाने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'एक खास दिवस, एक संस्मरणीय आठवण! तुमच्या कामाप्रती तुमची बांधिलकी पाहून मला नेहमीच आनंद झाला आहे…'. या पोस्टवरून असे समजते की, स्नेहाला अल्लू अर्जूनच्या यशस्वी वाटचालीसाठी आनंद झाला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांसह अनेक स्टार्संनी अल्लू अर्जूनवर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास अल्लू अर्जुन आगामी 'पुष्पा : द राइज' च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनणारा 'पुष्पा २' हा चित्रपट ऑगस्ट २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. ( Allu Arjun National Award )

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news