Allu Arjun Wax Statue : दुबईच्या म्युझियममध्ये उभारणार अल्लू अर्जुनचा वॅक्स स्टेच्यू | पुढारी

Allu Arjun Wax Statue : दुबईच्या म्युझियममध्ये उभारणार अल्लू अर्जुनचा वॅक्स स्टेच्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun Wax Statue) चा मेणाचा पुतळा दुबईतील वॅक्स म्युझियममधील उभारण्यात येणार असल्याची माहिती समोर आहे. अल्लू अर्जुन सध्या आपल्या वॅक्स स्टेच्यूमुळे चर्चेत आहे. शिवाय त्याचा आगामी पुष्पा २ चित्रपटामुळेही तो चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो स्टेच्यूसाठी माप देताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये त्य़ाने ब्लॅक सूट घातल्याचे दिसत आहे. (Allu Arjun Wax Statue)

हा व्हिडिओ मादाम तुसाद दुबईच्या पेजने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, अल्लू गाडीतून उतरतो. तो स्टेच्यूसाठी माप देतानाही दिसतो. त्याचा पुतळा लाल रंगाच्या जॅकेटमध्ये दिसेल, जो त्याने त्याच्या ‘अला वैकुंठपुरामुलू’ चित्रपटात परिधान केला होता.

पुष्पा २ कधी रिलीज?

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ चित्रपट १५ ऑगस्ट, २०२४ रोजी रिलीज होतोय. याआधी या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर रिलीज झाले होते. आता त्याच्या चाहत्यांना पुष्पा २ची उत्सुकता लागून राहिली आहे.

संबंधित बातम्या-

Back to top button