Allu Arjun Pushpa 2 : अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ होणार या दिवशी रिलिज; जाणून घ्या चित्रपटाविषयी सर्वकाही | पुढारी

Allu Arjun Pushpa 2 : अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ होणार या दिवशी रिलिज; जाणून घ्या चित्रपटाविषयी सर्वकाही

पुढारी ऑनलाईन डेस्क : वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर (Box Office) सुमारे १२३५ कोटींची कमाई करणाऱ्या ‘पुष्पा: द राइज’च्या (Pushpa : The Rise) सिक्वेलची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अलीकडे अल्लू अर्जुन (Allu Arjun)आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर ‘पुष्पा २: द रुल’ (Pushpa 2: The Rule) या चित्रपटाच्या टीझरबद्दल अटकळ बांधली जात होती, आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. यासोबतच सूत्रांच्या हवाल्याने चित्रपटाच्या शूटिंग शेड्यूलबाबत मोठे दावे केले जात आहेत. (Allu Arjun Pushpa 2)

डिसेंबरमध्ये सुरू होणार चित्रपटाचे शूटिंग (Allu Arjun Pushpa २)

सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, दिग्दर्शक सुकुमार (Sukumar) यांना ‘पुष्पा २: द रुल’ हा पहिल्या भागापेक्षा म्हणजे ‘पुष्पा: द राइज’ पेक्षा मोठा आणि चांगला बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडयची नाही. त्यांनी इतर ठिकाणी चित्रपटाच्या अनेक चाचणी शूटची योजना आखली आहे आणि समानधानकारक निकालानंतरच प्रत्यक्ष शूटिंगला सुरुवात पुढे जातील. चित्रपटाचे शूटिंग डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल असा अंदाज आहे.

‘पुष्पा २: द रुल’ २०२४ मध्ये होणार रिलीज

सूत्रांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, सुकुमारच्या परफेक्शनमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला उशीर होणार आहे. कारण त्याला चित्रपटाच्या शूटिंगमध्ये कोणत्याही प्रकारची घाई नको आहे. यामुळेच चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘पुष्पा २’ मार्च किंवा एप्रिल २०२४ मध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. पुष्पा या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये पुष्पराजचे आयुष्य जवळून दाखवले जाणार आहे. यामध्ये त्याचे बालपण, त्याचे वडील आणि सावत्र भावंडांशी असलेले नाते इत्यादींचा शोध घेण्यात येणार आहे. दुसर्‍या भागात भंवर सिंग (फराद फाझील) सोबत पुष्पाचा सामना सुरूच राहील. (Allu Arjun Pushpa 2)

डिसेंबरमध्ये येणार चित्रपटाचा टीझर?

नुकतीच या चित्रपटाच्या टीझरची बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, जवळपास ४५० कोटी रुपये खर्चून बनवल्या जाणार्‍या ‘पुष्पा २: द रुल’चा टीझर हॉलिवूड चित्रपट ‘अवतार २: द वे ऑफ वॉटर’सोबत जोडला जाणार आहे. म्हणजे पुष्पाचा टीझर १६ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटाचा पहिल्या भागाच्या रिलीजला (१७ डिसेंबर) एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (Allu Arjun Pushpa 2)

परदेशातील थिएटर हक्कांसाठी ८० कोटींची मागणी

रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की ‘पुष्पा २: रुल’च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या परदेशी थिएटर हक्कांसाठी मोठ्या रकमेची मागणी केली होती. एसएस राजामौली यांच्या राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर चित्रपट ‘RRR’ च्या परदेशी थिएटर हक्कांच्या (सुमारे ७० कोटी रुपये) खर्चापेक्षा जास्त म्हणजे यासाठी सुमारे ८० कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

अधिक वाचा :

Back to top button