Khurchi : सत्ता कुणाची पण असो, आता खुर्ची आपलीच; सत्तेच्या ‘खुर्ची’ चा थरार भेटीला | पुढारी

Khurchi : सत्ता कुणाची पण असो, आता खुर्ची आपलीच; सत्तेच्या ‘खुर्ची’ चा थरार भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘योगआशा फिल्म्स’ संस्थेतर्फे संतोष कुसुम हगवणे व योगिता गवळी निर्मित आणि शिव धर्मराज माने व संतोष हगवणे दिग्दर्शित ‘खुर्ची’ ( Khurchi ) चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख रिलीज झाली आहे. बहुप्रतीक्षित ‘खुर्ची’ चित्रपट १२ जानेवारी २०२४ रोजी रिलीज होणार आहे.

संबंधित बातम्या 

‘सत्ता कुणाची पण असो, आता खुर्ची आपलीच’ असं म्हणत चाहत्यांची उत्कंठा वाढवणारा ‘खुर्ची’ हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘खुर्ची’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाची पहिली झलक चाहत्यांच्या भेटीला आली होती, तेव्हापासूनच उत्सुकता ताणली गेली होती. आता या ‘खुर्ची’चं राजकारण पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी काही काळ वाट बघावी लागणार नाही. ‘खुर्ची’ हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच १२ जानेवारी २०२४ मध्ये मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. चाहत्यांची आतुरता पाहून नुकतेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

‘खुर्ची’ ( Khurchi ) चित्रपटाच्या रिलीज डेटसोबत आता या चित्रपटाचं नवं मोशन पोस्टर सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे. या मोशन पोस्टरमध्ये निवडणुकीचा धुराळा उडताना दिसला आहे. तर, लोक हातात झेंडे घेऊन जल्लोष करत आहे. या पार्श्वभूमीवर दमदार संवाद आणि गाणी ऐकू येत आहेत. तर, या जल्लोषाच्या केंद्रस्थानी एक खुर्ची आहे. ढोल -ताशे आणि माणसांच्या इतक्या गर्दीत ही सत्तेची ‘खुर्ची’ मात्र, सोन्यासारखी चमचमत आहे. अगदी राजेशाही असा या खुर्चीचा थाट आहे. याच ‘खुर्ची’ साठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या खुर्चीसोबत ‘आता खुर्ची आपलीच’ म्हणत चित्रपटाची रिलीज डेट सांगण्यात आली आहे.

‘आराध्या मोशन फिल्म्स’ आणि ‘योग आशा फिल्म्स’ निर्मित संतोष कुसुम हगवणे आणि योगिता गवळी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी सांभाळली आहे. चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये सत्तेसाठीची निवडणूक जिंकल्यानंतर कार्यकर्त्यांचा आनंद ओसंडून वाहत असलेला पाहायला मिळला आहे. कार्यकर्त्यांचा जल्लोष, सभासदांचे प्रेम, प्रचार याचे वर्णन मोशन पोस्टरमध्ये करण्यात आले आहे.

सहनिर्माता प्रदीप नत्थीसिंग नागर, आतिश अंकुश जवळकर आणि डॉ. अमित बैरागी यांची सहनिर्मिती असून, राजकारणाचे विविध रंग या चित्रपटात रेखाटण्यात आले आहे. तर, राजीव पाटील या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद निर्माते संतोष वसंत हगवणे यांचे आहे. राहुल रामपाल या चित्रपटाचे सहदिग्दर्शन करत आहेत. तर, क्रिएटिव्ह हेड म्हणून प्रतिक वसंतराव पाटील यांनी बाजू सांभाळली आहे. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी योगेश कोळी यांनी सांभाळली आहे.

‘खुर्ची’ या चित्रपटात अभिनेता अक्षय वाघमारे, एस. आर्यन, राकेश बापट, अभिनेत्री प्रीतम कागणे, अभिनेत्री श्रेया पासलकर यांच्यासह सुरेश विश्वकर्मा, महेश घाग, कल्याणी नंदकिशोर हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. तर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि अभिनेत्री आराधना शर्मा यांच्या विशेष भूमिका या चित्रपटात दिसणार आहेत.

चित्रपटाची गाणी प्रशांत मडपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिली असून, त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिले आहे. तर आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपुरकर, रसिका वाखरकर, अमिता घुगरी आणि आर्यन यांनी आपल्या सुमुधुर आवाजाने या चित्रपटासाठी गायन केलं आहे. यामुळे ‘खुर्ची’ हा चित्रपट १२ जानेवारी २०२४ ला पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा : 

Back to top button