Katrina Kaif
Katrina Kaif

Tiger 3: Katrina Kaif चा केवळ टॉवेल गुंडाळून सीन, नेटकरी म्हणाले..(Video)

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टायगर ३ चा ट्रेलर रिलीज होताच इंटरनेटवर धुमाकूळ पाहायला मिळाला. (Tiger 3) आता या चित्रपटाची आणखी एका गोष्टीमुळे चर्चा होत आहे, तो म्हणजे कॅटरिना कैफचा टॉवेल सीन. या चित्रपटातील एका टॉवेल सीनची खूप चर्चा होत आहे. 'टायगर ३' च्या ट्रेलरमध्ये कॅटरीना कैफ व्यवहार ॲक्शन करताना दिसत आहेत. टायगर ३ च्या ट्रेलरमध्ये एक टॉवेल फाईट सीन आहे, ज्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. (Tiger 3)

संबंधित बातम्या –

'टायगर 3' च्या संपूर्ण ट्रेलरमध्ये कॅटरिना कैफ अनेकवेळा दिसली आहे. कधी सलमान खानसोबत रोमान्स करताना, तर कधी ती शत्रूपासून वाचवताना दिसली. दरम्यान, तिचा एक सीन आहे. या सीनमध्ये कॅटरिना केवळ टॉवेलमध्ये ५ सेकंद लढताना दिसत आहे. कॅटरिना आणि तिचा शत्रू दोघेही फक्त टॉवेलमध्ये आहेत, दरम्यान दोघांमध्ये जोरदार भांडण होते.

कॅटरिना कैफवर चित्रित केलेला हा सीन खूप व्हायरल झाला. हा ५ सेकंदाचा सीन असून या सीनने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

कॉमेंट्सचा वर्षाव

'टायगर 3' च्या ट्रेलरमधील कॅटरिना कैफच्या टॉवेल सीनवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'हा सीन सिल्व्हर स्क्रीनवर कहर करेल. कॅटरिना कैफ ही खऱ्या अर्थाने परफेक्शनची व्याख्या आहे.' दुसऱ्या यूजरने लिहिले, 'माझ्यावर विश्वास ठेवा, हा सीन इतिहासातील सर्वात हॉट सीन असणार आहे, कारण कॅटरिना कैफने हा सीन फक्त टॉवेलमध्ये केला आहे.'

(video-SRK Tamim Ahmed  x वरून साभार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news