Gautami Patil : गौतमीचं दिलाच्या मळामध्ये प्रेमाचं पाखरू भुलंलंय… (video)

Gautami Patil
Gautami Patil

पुढारी ऑनलाईन डेस्क : लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) तिच्या डान्समुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या गौतमी तिच्या आणखी एका व्हिडिओने सोशल मीडियावर प्रकाश झोतात आली आहे. परंतु, यावेळी ती तिच्या लावणी नृत्याने नव्हे तर तिच्या अनोख्या गाण्याची चाहत्यांना भूरळ पडलीय.

संबधित बातम्या

गौतमी पाटीलने ( Gautami Patil ) तिच्या इन्स्टाग्रामवर एक नव्या रिल्स गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी गौतमी व्हाईट- ग्रीन रंगाच्या चुडीदारमध्ये एका टेबला जवळच्या खुर्चीत बसलेली पाहायला मिळत आहे. यावेळी तिच्या टेबलवर एक पाण्याचा ग्लास आणि खाण्याचा पदार्थ दिसत आहे. मोकळे केस, नटखट अदाची चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने '❤️Dilacha pakharu???☺️'.असे लिहिले आहे.

या व्हिडिओच्या सुरूवातीला पुरूषाच्या आवाजात 'तू मृगनयनी या नक्षत्राचा,तू … जुना ना तारा', आणि ॲक्शन असे म्हणत तिच्या अभिनयाला सुरूवात होते. याच दरम्यान एक व्यक्ती तिच्या पाठीमागून जातानाही दिसत आहे. यानंतर 'ये मन माझं डूलंतंय रं, स्वप्नात बघून फुललंय रं, ये दिलाच्या मळामध्ये प्रेमाचं पाखरू भुलंलंय रं. ये तुझ्या मागं पळतंय रं, ये तुझ्यासाठी झुरतंय रं… असे गाण्याचे बोल आहेत. यात गौतमीने खुर्चीवर बसूनच धमाकेदार ॲक्शन सीन केलं आहेत. या व्हिडिओला काही तासातच ५० हजारांहून आधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

यावरून गौतमी कोणाच्या तरी प्रेमात आहे काय?, तिच्या जवळ कोण व्यक्ती आहे? यासारखे अनेक प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र, हा गाण्याचा व्हिडिओ नेमका कशासाठी बनवला आहे याची माहिती समोर आलेली नाही. तर दुसरीकडे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला परवानगी नसतानादेखील अवैध पद्धतीने जमाव गोळा केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news