Mouni Roy : उफ्फ! मौनीने विना ब्लाऊज नेसली बंगाली साडी, काहींनी तर डोळेच बंद केले | पुढारी

Mouni Roy : उफ्फ! मौनीने विना ब्लाऊज नेसली बंगाली साडी, काहींनी तर डोळेच बंद केले

पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉट अभिनेत्री मौनी रॉय नेहमीच सोशल मीडियावर अपडेट असते. तिचा फिटनेस पाहून सर्वच फॅन्स तिच्या प्रेमात पडत असतात. आता तिचे नवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. (Mouni Roy ) तिने बंगाली साडीतील काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. यामध्ये तिने विना ब्लाऊज साडी नेसली आहे. त्यामुळे कॉमेंट बॉक्समध्ये काहींनी डोळे बंद केलेले इमोजी पोस्ट केले आहेत. (Mouni Roy)

संबंधित बातम्या-

मौनी रॉयने 🌸শুভ মহালয়া 🌸 असे बंगाली मध्ये कॅप्शन देत महालय आणि दुर्गापूजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या फोटोंवर तिचे काहींनी कौतुक तर काहींनी ट्रोल केले आहे. तिला एकाने म्हटलंय-नयनतारा तर दिसत नाहीस पण मिया खलिफा वाटत आहेस. दुसऱ्या ट्रोलरन म्हटलंय- फेम होण्यासाठीची ट्रिक. तिसऱ्याने म्हटलंय- या ड्रेसमध्ये ब्लाऊज असत नाही का?

तर काहींनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केलं आहे. युजर्सनी काय म्हटलंय पाहा-Certainly, The Epitome of Beauty❤️, In her Bengali eraa ✨, How can u look so beautiful in everything… ?? This pic is so ethereal., Bangali beauty, Super gorgeous Nayantara ❤️, Beautiful Pick ❤️❤️❤️.

ब्रालेस साडीत मौनीने आपले केस मोकळे सोडले आहेत. कानात झुमके, हातात बांगड्या आणि कपाळावर टिकली असा लूक केला आहे. लाल बॉड्रर असलेली पांढरी साडी तिने नेसलीय. सोबतच तिने विविध ठिकाणी फोटोसाठी पोझ दिलीय. पण, ब्लाऊज न घातल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

तिने आपल्या फोटोंना नयनतारा अशे नाव देखील दिलीय. तिच्या रिलीज झालेल्या वेब सीरिजमध्ये मौनी रॉयच्या पात्राचे नाव नयनतारा असे आहे. त्यामुळे अनेकांनी तिला नयनतारा या नावावरून कमेंट केल्या आहेत. मौनीची बेस्ट फ्रेंड दिशा पटानीनेही या फोटोंवर कॉमेंट केली आहे. तिने खूप सुंदर अशी कॉमेंट दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

Back to top button