Kiran Mane : मी बीचवर बीयर पीत पहुडलोय...मज्जा! 😜, किरण मानेंचा गोव्यात एन्जॉय | पुढारी

Kiran Mane : मी बीचवर बीयर पीत पहुडलोय...मज्जा! 😜, किरण मानेंचा गोव्यात एन्जॉय

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या सीझनमधून बाहेर पडल्यानंतर अभिनेता किरण माने (Kiran Mane) आपल्या कामात मग्न झाले आहेत. सध्या ते शूटिंगमध्ये बिझी आहेत आणि गोव्यात मस्त एन्जॉय करत आहेत. यावेळी त्यांनी आपले काही पोटोज इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत गोवा ! अशी कॅप्शन दिलीय. (Kiran Mane)

त्यांनी कॅप्शनमध्ये पुढा लिहिलंय-

प्रसन्न सुर्योदय… भन्नाट, नादखुळा बीच… आणि थोड्याच वेळात लाईट – कॅमेरा – ॲक्शन. एकतर शूटिंगसाठी गोव्यात येणं म्हणजे निव्वळ सुख. त्यात सीन असाय की मी बीचवर बीयर पीत पहुडलोय… मज्जा ! 😜😂😍

फॅन्सनी व्यक्त केली हिंदी बिग बॉसमध्ये बघण्याची इच्छा

एका युजरने लिहिलं आहे- बिग बॉसचे खरे विजेता तुम्ही आहात… तुम्हाला ट्रॉफी मिळावी, इतकी क्षमता तुमच्यामध्ये आहे…आता हिंदीमध्ये बघायचं आहे…, 😍😍😍😍😍, सिनमध्ये दाखव….पण खरं खूर पिऊ नकोस 😃, ❤️❤️❤️. अशा कमेंट्स देत फॅन्सनी हिंदी बिग बॉसमध्ये बघण्याची इच्छा व्यक्त  केलीय.

सातारकरांचं अफाट प्रेम

बिग बॉस मराठी सोमध्ये टॉप फाईव्हमध्ये किरण माने आले होते. या कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर साताऱ्यात त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. बॉम्बे रेस्टॉरंट ते राजवाडा या मार्गावर ही मिरवणूक निघाली होती. यावेळी माने यांच्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली होती. बिग बॉस फेम किरण माने यांचे मंगळवारी सायंकाळी साताऱ्यात आगमन झाले. पोवईनाका येथील राजधानी सातारा या सेल्फीपाईंटवर फटाक्याच्या आतषबाजीत गुलाब फुलांची उधळण करत, तुताऱ्यांच्या निनादात सातारकरांनी स्वागत केले होते. आकर्षक रंगी बेरंगी फुलांनी सजविलेल्या जीपमधून त्यांची मिकवणूक काढण्यात आली होती. सातारकरांचं माने यांच्यावरील अफाट प्रेम यावेळी दिसून आलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

Back to top button