Upcoming Marathi Movie : ‘धग’, ‘भोंगा’ नंतर प्रेक्षकांसाठी ‘आतुर’ सज्ज | पुढारी

Upcoming Marathi Movie : 'धग', 'भोंगा' नंतर प्रेक्षकांसाठी 'आतुर' सज्ज

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी चित्रपटरसिकांसाठी एक नवा विषय, नवा चित्रपट आणि नव्या धाटणीचं सादरीकरण सज्ज झाले आहे. दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांचा ‘आतुर’ चित्रपट येत आहे. याआधी त्यांनी धग आणि भोंगामुळे त्यांच्या चित्रपटांच्या बाबतीत प्रेक्षकांच्या अपेक्षा कमालीच्या वाढल्या होत्या. यानंतर या चित्रपटाची घोषणा केल्याने चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ( Upcoming Marathi Movie )

संबधित बातम्या 

आपल्या प्रत्येक कलाकृतीला मिडास टच देणारे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील ( Shivaji Lotan Patil ) यांच्या पोतडीतून ‘आतुर’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक ६ ऑक्टोबर रोजी लाँच झाला. पण शिवाजी लोटन पाटील यांचा चित्रपट म्हणजे, प्रेक्षकांची उत्सुकता आत्तापासूनच कमालीची ताणली गेली आहे. आणि या उत्सुकतेत भर घातली ती चित्रपटाच्या मुख्य भूमिकेतील अभिनेत्रीच्या नावाने. अभिनेत्री प्रीती मल्लापुरकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

खरंतर शिवाजी लोटन पाटील या नावाची वेगळी ओळख मराठी चित्रपट रसिकांना करून देण्याची अजिबात आवश्यकता नाही. २०१४ साली आलेला ‘धग’ आणि नुकताच आलेला ‘भोंगा’ या त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यापाठोपाठ आता ते ‘आतुर’ चित्रपट घेऊन येत असल्याचं जाहीर होताच प्रेक्षक दमदार कथानक आणि दर्जेदार सादरीकरणासाठी सज्ज झाले आहेत. ६ ऑक्टोबरला चित्रपटाचा फर्स्ट लुक लाँच झाला असून ३ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

‘आतुर’ या चित्रपटाच्या नावावरून त्याच्या कथानकाविषयी अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. मात्र, शिवाजी लोटन पाटील यांची शैली, विषय हाताळण्याची पद्धत आणि प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत गुंतवून ठेवणारं ताकदीचं सादरीकरण आहे. यामुळे चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ( Upcoming Marathi Movie )

हेही वाचा : 

Back to top button