‘द कोकण कॉलेक्टिव्ह’ यांनी गायिले ‘खुमासदार नात्यांचा गोडा मसाला’ चं शीर्षकगीत | पुढारी

'द कोकण कॉलेक्टिव्ह' यांनी गायिले 'खुमासदार नात्यांचा गोडा मसाला' चं शीर्षकगीत

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावर ‘खुमासदार नात्यांचा गोडा मसाला’ नावाची एक आगळी वेगळी मालिका ३ ऑक्टोबरपासून चाहत्यांच्या भेटीस येत आहे. महिलांना प्राधान्य देणारी ही मालिका असून यातील तेंडुलकरांच्या घरात पुरुषांना प्रवेश नाही. मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना आवडला आहे. समर आणि सानिका यांच्या या प्रेमकहाणीत काय रंगत येणार?, हे पाहायला मिळणार आहे. मालिकेचे शीर्षकगीत ‘द कोकण कॉलेक्टिव्ह’ या समूहाने गायिले आहे. या समूहात रसिका बोरकर, कृतिका बोरकर, साक्षी म्हात्रे, निकिता घाटे आणि आरती सत्यपाल या गायिका आहेत. ‘खुमासदार नात्यांचा गोडा मसाला’ हे मालिकेचे नाव जितके सुंदर आहे तितकेच सुंदर असे शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

संबधित बातम्या 

या शीर्षकगीताचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे, या गाण्याचे संगीत दिग्दर्शन वेगळ्या आणि मनोरंजक पद्धतीने करण्यात आले आहे. मालिकेच्या पात्रांना साजेशे असे या शीर्षक गीताचे बोल आहेत. शीर्षक गीताचे बोल ‘आई, माई, ताई, आत्यांचा.. गोडा मसाला! खुमासदार नात्यांचा, गोडा मसाला!’ असे प्रेक्षकांना ताल धरायला लावणारे आहेत.

या गाण्याचे शीर्षकगीत अभिषेक खांडेकर यांनी लिहले असून राहुल खाडे आणि तेजस काळे यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. शिवाय ‘द कोकण कॉलेक्टिव्ह’ या समूहाने हे गायिले आहे. ही मालिका स्त्री अभिमुख असल्यामुळे ‘द कोकण कॉलेक्टिव्ह’ या गाण्याचे गायन केले आहेत. यामुळे ‘खुमासदार नात्यांचा गोडा मसाला’ या मालिकेसाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा : 

Back to top button