Mahadev Online Gamming Betting : ईडीचे Ranbir Kpoor ला समन्स | पुढारी

Mahadev Online Gamming Betting : ईडीचे Ranbir Kpoor ला समन्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला ( Ranbir Kpoor ) ईडीने समन्स पाठवले आहे. त्याला ६ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ‘महादेव गेमिंग-बेटिंग प्रकरणात’ रणबीर कपूरचे नाव पुढे आले आहे. त्याच्यासोबत टायगर श्रॉफ, सनी लिओनलादेखील चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ( Ranbir Kpoor )

संबंधित बातम्या – 

या केसमध्ये रणबीर कपूरसोबत इतर सेलिब्रेटींची नावे देखील समोर आली आहेत. रिपोर्टनुसार, या यादीत १५-२० सेलिब्रिटी आहेत, जे ईडीच्या रडारवर आहेत. आतिफ असलम, राहत फतेह अली खान, अली असगर, विशाल ददलानी, टायगर श्रॉफ, नेहा कक्कड, भारती सिंह, एली अवराम, सनी लिओनी, भाग्यश्री, पुलकित सम्राट, कीर्ती खरबंदा, नुसरत भरूचा, कृष्णा अभिषेक ही नावे असल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

‘महादेव गेमिंग-बेटिंग’ (mahadev online gamming betting case) एक ऑनलाईन सट्टेबाजीचा प्लॅटफॉर्म आहे. या ॲपचे प्रमोटर सौरभ चंद्राकर यांचे लग्न फेब्रुवारीत संयुक्त अरब अमीरातमध्ये झाले होते. लग्नात २०० कोटीहून अधिक खर्च करण्यात आला होता. या आलीशान लग्नाचा व्हिडिओ भारतीय एजन्सीच्या हाती लागला. लग्नात परफॉर्म करण्यासाठी जे जे सेलेब्स बोलावण्यात आले होते, तेदेखील रडारवर आहेत.

 

Back to top button