Urfi Javed Engagement : उर्फी जावेदने उरकला गुपचूप साखरपुडा?; अंगठी घालताना फोटो व्हायरल

Urfi Javed Engagement : उर्फी जावेदने उरकला गुपचूप साखरपुडा?; अंगठी घालताना फोटो व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस फेम अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या नवनविन फॅशन सेन्स आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. परंतु, आज उर्फी तिच्या अनोख्या फॅशन किवा वादग्रस्त वक्तव्याने नव्हे तर चक्क गुपचूप पद्धतीने साखरपुडा ( Urfi Javed Engagement ) उरकल्याने चर्चेत आली आहे. उर्फीच्या होणारा पतीसोबत एक फोटो व्हायरल होत आहे. परंतु, तो कोण आहे याची माहिती समोर आलेली नाही. या घटनेमुळे एकिकडे चाहत्यांना एक प्रकारचा धक्का बसला असून दुसरीकडे नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे.

संबधित बातम्या 

अभिनेत्री उर्फी जावेद एका तरूणासोबत अग्नीला साक्षी मानून साखरपुड्याची ( Urfi Javed Engagement ) अंगठी परिधान करताना दिसत आहे. यावेळी उर्फीने ब्लॅक रंगाची सलवार कमीज परिधान केले असून तिच्या डोक्यावर ओढणी दिसतेय. तर तिच्या शेजारी असणाऱ्या तरूणाने व्हाईट रंगाचे कपडे परिधान केले आहे. याशिवाय दोघांच्या समोर पुजेच्या साहित्यासोबत एक अग्नीकुंडदेखील दिसत आहे. याशिवाय आणखी एक तरूण त्याच्यासोबत दिसत आहे. हा फोटो खूपच व्हायरल होत आहे. मात्र, खरोखरंच उर्फीने साखरपुडा केला आहे की नाही? यांची अधिकृत्त माहिती समोर आलेली नाही. फोटोत त्या तरूणाचा चेहरा मात्र, स्पष्टपणे दिसत नाही.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. यात काही युजर्सनी 'उर्फीने पुन्हा नौंटकी केली असेल', 'हा साखरपुडा खोटा असेल', 'उर्फी असा गुपचूप साखरपुडा करणार नाही?' असे अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोलही केलं आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news