Bigg Boss Tamil-7 : बिग बॉस तमिल ७; कमल हासन पुन्हा होस्ट करताहेत शो

कमल हासन
कमल हासन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस तमिळ सीजन ७ मध्ये खूप बदल पाहायला मिळणार आहेत. यावेळी शोमध्ये दोन घरे असणार आहेत. आता या शोमध्ये इंडियन २ फेम सुपरस्टार कमल हासन यांची या शोमध्ये एन्ट्री झालीय. कमल हासन हा शो होस्ट करणार आहेत. (Bigg Boss Tamil-7 ) या शोमधील स्पर्धकांची नावे जाहीर झाली आहेत. रवीना दाहा, अनन्या राव, निविशा पासून ते माया क्रिष्णन, ज्योविका विजयकुमार पर्यंत सेलेब्स शोमध्ये पुन्हा धुमाकूळ घालायला येताहेत. टीव्ही आणि डिज्नी प्लस हॉटस्टार बिग बॉस तमिळ सीजन ७ वर हा शो प्रसारीत होणार आहे. १ ऑक्टोबरपासून हा शो सुरु झाला आहे. (Bigg Boss Tamil-7 )

संबंधित बातम्या –

बिग बॉस तमिळच्या मागील सीझनचा विजेता टीव्ही अभिनेता मोहम्मद अजीमने जिंकला होता. तर आपली लोकप्रियता वाढवणारा विक्रमन उपविजेता ठरला होता. मागील सीझनदेखील वादग्रस्त ठरला होता. बिग बॉस तमिळ सीझन ६ जवळपास १०५ दिवस चालला होता, ज्यामध्ये २१ स्पर्धक सहभागी झाले होते. शिविन, असल कोलारू, धनलक्ष्मी, एडीके, मैना नंदिनी आणि अमुधवनन अन्य काही स्पर्धकांनी मागील शोमध्ये आपली छाप सोडली होती.

 biggboss_tamil_season7 insta वरून साभार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news