पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या अनेक आठवड्यापासून जवान आणि गदर – 2 ची कमाई बॉक्स ऑफिसवर वाढत आहे. यांना टक्कर देण्यासाठी आता स्कंदा- 2 आला आहे. स्कंदा- 2 ने पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली आहे. राम पोथिनेनी आणि श्रीलीला यांचा उत्कृष्ट अभिनय असलेला तेलगू चित्रपट स्कंदाने -2 ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. राम पोथीनेनी आणि श्रीलीला यांच्यासह या चित्रपटात सई मांजरेकर, प्रिन्स सेसिल यांच्याही महत्वाच्या भुमिका आहेत. या तेलगू ॲक्शन ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन बोयापती श्रीनू यांनी केले आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली जाणून घेऊया. (skanda first day collection worldwide)
बॉक्स ऑफिसवर फुकरे -3, द वैक्सीन वॉर, चंद्रमुखी – 2 सोबतच गुरूवारी (दि.२८) स्कंदा -2 रिलीज झाला. स्कंदाने पहिल्या दिवशी केलेल्या दमदार कमाईमुळे या आठवड्यात बॉलिवूडलाच नाही तर दक्षिणेकडील चित्रपटांनाही मागे टाकेल, असं दिसून येत आहे. बॉक्स ऑफिस ट्रॅकर सचनिल्कच्या प्राथमिक माहितीनुसार, स्कंदा चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात १२.५६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचवेळी, हा चित्रपट जगभरात चांगली कमाई करेल असा अंदाज लावला जात आहे. या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 13 कोटींच्या जवळ पोहोचले असून आठवड्याभरात ही कमाई ५० कोटीपर्यंत पोहचू शकते. असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Skanda – 2 Box Office Collection)
बॉक्स ऑफिसवर आपली छाप टिकून राहावी, यासाठी या आठवड्यात जवान चित्रपटाच्या एक तिकीटावर एक मोफत तिकीटाची ऑफर देण्यात आली आहे. ज्यामुळे इतर चित्रपटांच्या कलेक्शनवर परिणाम होईल, असं वाटतं होतं पण अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या स्कंदावर याचा परिणाम झाल्याचं दिसून आला नाही. (skanda first day collection worldwide)
हेही वाचा :