Chandramukhi 2 : 'चंद्रमुखी-२'ची कासवगतीने कमाई, पहिल्या दिवशीची कमाई किती? | पुढारी

Chandramukhi 2 : 'चंद्रमुखी-२'ची कासवगतीने कमाई, पहिल्या दिवशीची कमाई किती?

पुढारी ऑनलाईन डेस्क : धाकडनंतर पुन्हा एकदा कंगना रानौत मोठ्या पडद्यावर अभिनय करताना दिसली. तिचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘चंद्रमुखी-२’ चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी ‘चंद्रमुखी-२’चा ट्रेलर रिलीज झाला होता. (Chandramukhi 2) ‘चंद्रमुखी-२’मध्ये कंगना रानौतसोबत राघव लॉरेंस मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटामध्ये दोघांनी खूप चांगला अभिनय केला आहे. आथा ‘चंद्रमुखी-२’ च्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. पण, पहिल्याच दिवशी काही खास कमाई झाली नाही. (Chandramukhi 2)

संबंधित बातम्या – 

कंगना रानौत आणि राघव लॉरेंसच्या या चित्रपटाचे बजेट ५० ते ६० कोटी रुपये आहे. या चित्रपटाने सर्व भाषांमध्ये पहिल्या दिवशी केवळ ५.५० कोटी रुपयांची कमाई केली. हे कलेक्शन सकाळी आणि दुपारच्या शोवर आधारीत आहे. चंद्रमुखी २ एक ॲक्शन, कॉमेडी, हॉरर आणि रोमान्स चित्रपट आहे. कंगना रानौत खूप सुंदर आणि वेगळ्या लूकमध्ये आहे. चंद्रमुखीच्या सुंदर अदांना खूप पसंत केलं जात आहे.

कंगना-राघव शिवाय चंद्रमुखी-२ मध्ये वादिवेलु, राधिका सरथकुमार, लक्ष्मी मेनन आणि अन्य कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे प्रोडक्शन लाइका कंपनीने केलं असून एम एम कीरावनी यांनी संगीत दिेले आहे. चंद्रमुखी-२ हा चित्रपट २००५ मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाचा सीक्वल आहे. हा चित्रपट तमिल, तेलुगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज केला जाईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

Back to top button