Lata Mangeshkar Birth Anniversary : मेरी आवाजही मेरी पेहचान हैं! | पुढारी

Lata Mangeshkar Birth Anniversary : मेरी आवाजही मेरी पेहचान हैं!

‘ऐ मेरे वतन के लोगों’ 

’ऐ मेरे वतन के लोगों’ हे गाणे अजरामर गीतांपैकी एक असून हे गाणे देशभक्तीपर गीत आहे. हे गाणी ऐकून माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यातही पाणी आले होते. ( Lata Mangeshkar Birth Anniversary)

‘अजीब दास्तां हैं ये…’
1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल अपना और प्रीत पराई’ या सिनेमातील ‘अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहाँ खतम…’ हे गाणे अभिनेत्री मीनाकुमारी यांच्यावर चित्रित केले होते. ( Lata Mangeshkar Birth Anniversary)

‘कोरा कागज था ये मन मेरा’
‘कोरा कागज था ये मन मेरा’ हे द्वंदगीत ‘आराधना’ या सिनेमातील असून हे गाणे अभिनेते राजेश खन्ना आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित करण्यात आले.

‘जिंदगी प्यार का गीत है’
‘जिंदगी प्यार का गीत है’ जीवनातील सत्यावर आधारलेले गाणे ‘सौतन’ या सिनेमातील असून हे गाणे अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे आणि अभिनेते राजेश खन्ना यांच्यावर चित्रित केले.

‘परदेसिया, ये सच है पिया’
‘परदेसिया, ये सच है पिया’ हे गाणे ‘मि. नटवरलाल’ या सिनेमातील असून हे गाणे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा यांच्यावर शूट करण्यात आले.

‘दीदी तेरा देवर दिवाना’
‘दीदी तेरा देवर दिवाना’ हे गाणे ‘हम आपके कौन’ या सिनेमातील असून, ते अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अभिनेता सलमान खान यांच्यावर चित्रित करण्यात आले.

 

Back to top button