Tiger 3 Teaser : तुफानी राडा करायला आला सलमान खान, ‘टायगर ३’ टीझर पाहाच (Video) | पुढारी

Tiger 3 Teaser : तुफानी राडा करायला आला सलमान खान, 'टायगर ३' टीझर पाहाच (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या फॅन्सना त्याचा आगामी चित्रपट टायगर ३ च्या टीझरची उत्सुकता लागून राहिली होती. (Tiger 3 Teaser) आता ही प्रतीक्षा संपली असून वायआरएफने टायगर ३ चित्रपटाचा टीझर रिलीज केलाय. हा टीझर ‘टायगर का मेसेज’ नावाने रिलीज केला गेलाय. (Tiger 3 Teaser)

टाइगर ३ चा टीझर आज सकाळी ११ वाजता रिलीज केला गेला. YRF च्या यूट्यूब चॅनेलवर हा टीझर व्हिडिओ पाहता येईल. टायगर ३ यावर्षीचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरणार आहे. या चित्रपटासाठी आतापासूनच क्रेझ आहे. पुन्हा एकदा कॅटरीना-सलमान एकत्र यामध्ये दिसताहेत. चित्रपटातील इमरान हाशमीची भूमिका देखील महत्त्वाची आहे.

सलमान खानने शेअर केली पोस्ट

सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपला एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तो आपला चेहरा लपवताना दिसतो आहे. त्याचा फक्त एक डोळा दिसतो आहे. सोबतच सलमान खानने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘एक मेसेज आहे। देतो… उद्या. टायगरचा मेसेज उद्या ११ वाजता सकाळी. टायगर ३ दिवाळीला हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये चित्रपटगृहात रिलीज होईल.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

Back to top button