पुढारी ऑनलाईन डेस्क : परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा लग्नबंधनात अडकल्यानंतर तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर आपला वेडिंग लुक शेअर केला आहे. (Parineeti Chopra Wedding) राघव-परिणीतीचे फोटो समोर येताच तिच्या ब्रायडल लूकची चर्चा रंगलीय. परिणीतीचा वेडिंग लूक खूप सुंदर तर आहेच शिवाय खूप खासदेखील आहे. (Parineeti Chopra Wedding)
परिणीतीचा आयवरी आणि गोल्ड शेडचा लेहेंगा खूप सिंपल आणि क्लासी लूकवाला होता. मनीष मल्होत्राने हा लेहेंगा डिझाईन केला होता. विशेष म्हणजे, हा लेहेंगा तयार करण्यासाठी जवळपास १०३ दिवसाचा वेळ लागू शकतो. टोनल एक्रु बेसने बनलेल्या या लहेंग्यावर सीक्विनचे खूप बारीक हँडवर्क करण्यात आले आहे. दुपट्टाचा बेस ट्यूलच्या कपड्याचा आहे. त्याच्या बॉर्डरवर सीक्विनचे काम करण्यात आले आहे. तसेच बॉर्डरला मोती आहेत. दुपट्टाची आणखी एक खासियत म्हणजे त्यावर राघव असेदेखील लिहिले आहे.
परिणीतीने मनीष मल्होत्राची डिझाईन केलेले दागिने घातले होते. लग्नासाठी मल्टीलेयर्ड अनकट डायमंड नेकलेस घातला होता. यामध्ये जाम्बियन आणि रशियन एमराल्ड होते. परिणीताने मांग टीका, हाथ फूल आणि इअरिंग्स घातले होते. ट्रॅडिशनल पंजाबी ब्राईड प्रमाणे परिणीतीने पेस्टल शेडचा चूडा आणि कस्टमाईज्ड कलीरे घातले होते.