पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खानने रेकॉर्ड ब्रेक कमाई करत १ हजार कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन पार केले आहे. (Jawan) ७ सप्टेंबर रोजी रिलीज झालेला या चित्रपटाने ओपनिंग डेला ७५ कोटींची कमाई केली होती. नंतर ३०० कोटी, ४०० कोटी आणि नंतर ५०० कोटींच्या क्लबमध्ये हा चित्रपट समाविष्ट झालाय. आता वर्ल्डवाईड या चित्रपटाने १००० कोटी पार केले आहेत. (Jawan)
आता १००० कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट झालेले शाहरुख खानचे दोन चित्रपट ठरले आहेत. जवानने रविवारी १ हजार कोटींचा गल्ला जमवला होता. हिंदी भाषेत रविवारी ३३.६४ टक्के तर तमिळमध्ये ४६.९२ तर तेलुगु भाषेत २४.८६ टक्के व्यवसाय झाला आहे.
चित्रपट समीक्षक रमेश बाला यांच्या माहितीनुसार, शाहरुखचा हा चित्रपट माईलस्टोन ठरला आहे. त्यांनी लिहिले आहे की, शाहरुख खान पहिला भारतीय सिवेमा स्टार आहे, ज्य़ाचे दोन चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये आहेत. २०२३ मध्ये त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहेत. आता हे दीर्घकाळ रेकॉर्ड ब्रेक राहिल.
चित्रपटाच्या यशानंतर शाहरुख खानने पत्रकार परिषद घेऊन चित्रपटाच्या कलेक्शनविषयी सांगितले. तो म्हणाला, हा उत्सव आहे. वर्षानुवर्षे चित्रपटासोबत जगण्याची संधी क्वचितच मिळते. कोविड आणि वेळेच्या कमतरतेमुळे जवान बनवण्याचे काम चार वर्षांपासून सुरू आहे. या चित्रपटात बरेच लोक सहभागी झाले होते. विशेषत: दक्षिणेतील लोक जे मुंबईत येऊन स्थायिक झाले आहेत आणि गेल्या चार वर्षांपासून मुंबईत राहत आहेत आणि या चित्रपटासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. हे खरंच खूप कठीण काम आहे."