Priyanka Chopra : निक जोनससोबत देसी गर्लचे मुंबईत आगमन, क्यूट मालतीही दिसली

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) पती निक जोनस आणि मुलगी मालतीसोबत मुंबईत पोहोचली. मालतीला घेऊन ती विमानतळाबाहेर स्पॉट झाली. तिची झलक पाहण्यासाठी लोकांची गर्दी विमानतळाबाहेर झाली. विशेष म्हणजे, प्रियांकाने मालतीला घेऊन मीडियासमोर एकापेक्षा एक पोझ दिले. इतकचं नाही तर तिने निक जोनाससोबत फोटोज क्लिक केले. (Priyanka Chopra)
प्रियांका चोप्रा पहिल्यांदाच मुलगी मालतीला घेऊन मुंबईत आली. दोघे विमानतळाबाहेर दिसले. यावेळी प्रियांका आनंदात होती. तिने पिंक हाय स्लिट ड्रेस परिधान केला होता. तर निक जोनासने ब्लॅक हुडी, डेनिम जीन्स आणि ऑरेंज कॅप घातली होती. प्रियांका आणि तिची मुलगी पाहून चाहतेही खुश झाले.
प्रियांकाने वेस्टर्न कपडे परिधान केले असले तरी तिने कॅमेरासमोर सर्वांना नमस्कार केले. तिने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ती अद्यापही देसी गर्लच आहे.
(video-Viral Bhayani insta)
- प्राजक्ता माळीचे हटके फोटो
- जान्हवी कपूर : ‘एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत’
- Parineeti Raghav: राघव-परिणीती लवकरच लग्नबंधनात? हार्डी संधूने दिल्या शुभेच्छा
View this post on Instagram