कामगारांच्या जीवनावर भाष्य करणारा ‘महासत्ता’ ओटीटीवर | पुढारी

कामगारांच्या जीवनावर भाष्य करणारा 'महासत्ता' ओटीटीवर

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्रजांपासून आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अहिंसेच्या मार्गावर चालून महात्मा गांधींनी देशाला स्वतंत्र मिळवून दिले. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन निर्माण झालेला ‘महासत्ता’ हा मल्टीस्टारर चित्रपट येत्या २९ सप्टेंबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अवतारनार आहे.

‘महासत्ता’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश मोरे आणि निर्मिती रवी अग्रवाल यांनी केले आहे. अरुण नलावडे, अविनाश नारकर, मिलिंद शिंदे, संदेश जाधव, अश्विनी एकबोटे, शैला काणेकर, ज्योती सुभाष यांच्या भूमिका आहेत.

‘महासत्ता’ हा चित्रपट ७० कामगारांभोवती फिरतो. चेंबूरच्या एका मोठ्या कंपनीमध्ये काम करणारे कामगार ज्यांनी आपल्या आयुष्याचे १५ ते २० वर्ष कंपनीला दिले, त्यांना कंपनीने कुठलीही पूर्वकल्पना न देता थेट कामावरून काढून टाकले, या अन्यायाविरुद्ध पुकारलेल्या बंडाचा आवाज म्हणजे ‘महासत्ता’ चित्रपट होय.

Back to top button