Kangana Ranaut : कंगना खरचं राजकारणात येतेय का? काय म्हणाली वाचा

कंगना राणौत
कंगना राणौत

पुढारी ऑनलाईन डेस्क : मंगळवारी नव्या संसद भवनचे उद्घाटन झाले. यामध्ये कंगना राणौत आणि ईशा गुप्ता या दोन बॉलीवूड अभिनेत्रींनी हजेरी लावली. या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर कंगनाने राजकारण क्षेत्रात उतरण्याविषयी सांगितले. (Kangana Ranaut) आगामी २०२४ च्या निवडणुकीबद्दलही तिने सांगितले. (Kangana Ranaut )

कंगना राणौत बॉलीवूडच्या 'त्या' सेलेब्सपैकी एक आहे, जी स्पष्टपणे आपले मुद्दे मांडते. याशिवाय ती देशाच्या राजकारणात आणि अन्य मुद्द्यावरदेखील आपली मते मांडते. आता कंगनाने आपण राजकारणात उतरणार असल्याकडे इशारा दिलाय. कंगनाला एका मुलाखतीत विचारण्यात आले की, तिला राजकारणात यायचेय? यावर ती काय म्हणाली पाहा-

'एक कलाकार म्हणून मी राजकारणात येण्यासाठी उत्सुक आहे. पण, सध्या माझ्यासाठी फार घाई होईल.' कंगनाने हेदेखील म्हटलं की, प्रत्येक दिवस भारत अधिक उत्तमोत्तम होत आहे.

२०२४ च्या निवडणुकीवर काय म्हणाली कंगना?

कंगना म्हणाली, तिला पीएम नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधी सध्या मिळालेली नाही. ती २-३ वर्षांपूर्वी त्यांना भेटली होती. कंगनाने सांगितले की, ती खुश आहे, जेव्हापासून मोदी सरकार आले आहे, तेव्हापासून देशात खूप काही सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. कंगनाने पुढे २०२४ च्या निवडणुकीबद्दल सांगितले की, ती संपूर्ण आकाशात भगवा रंग पाहत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news